ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी विवेकला 'या' अभिनेत्रीची मदत

कोण आहे ही अभिनेत्री 

Updated: Sep 19, 2019, 02:56 PM IST
ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी विवेकला 'या' अभिनेत्रीची मदत

मुंबई : बॉलिवूडमधील सलमान खान आणि ऐश्वर्या रायचे अफेअर अतिशय चर्चेत राहिलं आहे. आजही याबाबत चर्चा केली जाते. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान आणि ऐश्वर्याच्यामध्ये विवेक ओबेरॉय आल्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. आणि याचा फटका विवेक ओबेरॉयला चांगलाच बसला आहे. 

सलमान खान, ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील दुरावा आजही स्पष्ट आहे. ऐश्वर्याशी नातं तुटल्यानंतर विवेक ओबेरॉयच्या करिअरचा ग्राफ खाली आला हे स्पष्टच आहे. या नात्याच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्याला बॉलिवूडमधीलच एका अभिनेत्रीची मदत झाली. 

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून बॉलिवू़डची बेबो म्हणजे करीना कपूर होय. करीना कपूर विवेकला भरपूर मदत करत होती. त्याला या दुःखातून सावरण्यासाठी करीनाने खूप मदत केली. अनेकदा करीना त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठी डिनरला जात असे. 

करीना विवेकला कायम एकच सांगायची, चांगली मुलगी बघून तू लग्न करं. कायम तिच्या या वाक्यापासून पळण्यासाठी तो सैफची मदत घेत असे. अगदी त्याप्रमाणेच झालं विवेकने चांगल्या मुलीशी लग्न केलं. सलमान-ऐश्वर्या आणि विवेक यांचं नातं खराब होऊन आता १५ वर्षे झाले. आजही हे तिघं एकमेकांसमोरून गेले तरी बघत नाहीत, बोलत नाहीत. २००३ मध्ये विवेकने याबाबत खरं बोलण्याची हिम्मत दाखवली. पण त्याची ही चूक त्याला चांगलीच महागात पडली. 

विवेकने ऐश्वर्या आणि सलमानच्या नात्याबद्दल अगदी स्पष्ट एका पत्रकार परिषदेत खुलासा केला होता. आणि त्याची ही चूक त्याला सर्वात जास्त महागात पडली. यानंतर विवेकचं करिअरचं संपलं.