'बदो बदी- बदो बदी!’ ढिंचॅक पूजानंतरचं सोशल मीडियावरील सर्वात वाईट साँग अखेर डिलीट

Chahat Fateh Ali Khan Bado Badi Song:  चाहत फतेह अली खानचं 'बदो बदी- बदो बदी' गाणं अखेर डिलीट

दिक्षा पाटील | Updated: Jun 6, 2024, 04:39 PM IST
'बदो बदी- बदो बदी!’ ढिंचॅक पूजानंतरचं सोशल मीडियावरील सर्वात वाईट साँग अखेर डिलीट title=
(Photo Credit : Social Media)

Chahat Fateh Ali Khan Bado Badi Song: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एका नवा ट्रेंड सुरु झाला आहे. तो म्हणजे एका गाण्याचा. या गाण्याचे बोल हे 'आए हाय, ओए होए... बदो बदी।' आहेत. लोकं यावर अनेक मीम्स देखील बनवत आहेत. त्याशिवाय यात दिसलेल्या दोन्ही कलाकारांची नक्कल देखील करत आहेत. जसे की त्यांचे स्टेप्स. ज्या प्रमाणे आधी सोशल मीडियावर 'बचपन का प्यार' या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याप्रमाणे या गाण्यानं सगळ्यांच्या डोक्याला ताप केला आहे. अनेकांनी हे गाणं ऐकल्यानंतर कानातून रक्त आल्याचे म्हटले आहे. तर आता अशा सगळ्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे हे गाणं युट्यूबवरून काढून टाकण्यात आलं आहे. 

चाहत फतेह अली खाननं व्हायरल होत असलेलं बदो बदी हे गाणं युट्यूबवरून काढून टाकण्यात आलं आहे. हे मुळ गाणं लोकप्रिय आणि लेजेन्डरी गायिका नूर जहां यांचं आहे. त्यांनी गायलेलं हे मुळं गाण आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. त्यामुळे जेव्हा चाहत फतेह अली खानचं हे नवं गाणं आलं तेव्हा सोशल मीडियावर लोक त्या गाण्यासाठी उत्सुक होते. पण मग त्या गाण्यानं सगळ्यांना निराश केलं. या गाण्याला एका महिन्यात जवळपास 28 मिलियन पेक्षा जास्त व्ह्युज मिळाले. पण हे गाणं अखेर युट्यूबवरून काढूण टाकण्यात आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याचं कारण हे कॉपी राईट असल्याचं म्हटलं जातं आहे. 

ओरिजीनल सॉन्ग

मुळ गाण्याविषयी बोलायचे झाले तर ते गाणं नूर जहां यांनी 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बनारसी ठग'मध्ये गायलं होतं. 

दरम्यान, एप्रिलमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर सगळीकडे हेच गामं प्रेक्षकांना ऐकायला मिळालं. या गाण्यानं भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशपासून वेगवेगळ्या देशातील नेटकऱ्यांना आणि प्रेक्षकांना वेड लावलं. अनेक नेटकरी हे या गाण्यावर रील करताना दिसत आहेत. काही नेटकरी ही चाहत फतेह अली खान यांची मिमिक्री करताना दिसत आहेत. तर काही त्यांना ट्रोल करत होते. 

हेही वाचा : 'अनेकांनी कॉंग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला पण...', रितेश देशमुखनं शेअर केला विलासरावांचा 'तो' व्हिडीओ

चाहत फतेह अली खान यांच्या विषयी बोलायचे झाले तर ते म्युजिशियन, बॅन्ड, गायक आणि सॉन्ग रायटर लिहिलं आहे. अनेक ठिकाणी हे राहत फतेही अली खानशी जोडलेला आहे. रिपोर्ट्सनुसार, राहत फतेह अली खानशी त्याचं काही खास कनेक्शन नाही. त्याचं खरं नाव हे काशिफ राणा आहे आणि त्याचं स्टेज नाव हे चाहत फतेह अली खान आहे.