'या' अभिनेत्रीनं हायस्लीट ड्रेस परिधान करत शेअर केला व्हिडीओ

अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 6, 2022, 09:19 PM IST
'या' अभिनेत्रीनं हायस्लीट ड्रेस परिधान करत शेअर केला व्हिडीओ  title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मौनी रॉयने (Mouni Roy) बॉलिवूडमध्येही स्वत: ची जागा मिळवली आहे. मौनी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मौनी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच मौनीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहे. मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. 

मौनीनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत मौनीनं गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा रिव्हीलिंग ड्रेस घालून मौनी बागेत फिरताना दिसत आहे. मौनीच्या या ड्रेसमध्ये एका बाजूनं थाई स्लिट आहे. तिचा हा ड्रेस इतका रिव्हिलींग आहे की सगळ्यांचे लक्ष त्या ड्रेसनं वेधले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मौनीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मौनीनं ब्लाउज शिवाय साडी परिधान केली आहे. तिचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला होता. यासोबतच अभिनेत्रीनं बेडरूममध्ये बेडवर पडून अनेक पोज दिल्या. मौनीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. मौनी रॉय लग्नानंतर अधिक बोल्ड झाली अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.