अनुपम खेर सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. त्यांची एक मुलाखत सध्या खूप चर्चेत आहे. कारण या मुलाखतीत लग्नाच्या 39 वर्षानंतर त्यांची खंत बाहेर आली आहे. अनुपम खेर यांनी स्वत:चं मूल न झाल्याची व्यथा मांडली आहे. अनुपम खेर यांची दोन लग्न केली आहेत. त्याचं पहिलं लग्न 1979 मध्ये मधुमालती कपूरसोबत झालं होतं. पण हे लग्न एका वर्षातच संपुष्टात आलं. अनुपम यांनी दुसरं लग्न किरण खेरशी केलं. खरं तर किरण यांचंदेखील हे दुसरं लग्न आहे. किरण यांचं पहिलं लग्न उद्योगपती गौतम बेरीशी झालं होतं. पदरात 4 वर्षांचा मुलगा असताना त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर अनुपम यांनी किरणसोबत 4 वर्षांचा सिकंदरला आपलं आडनाव दिलं आणि वडिलांसारखी माया केली.
नुकताच झालेल्या या मुलाखतीत त्यांनी स्वत:च्या मुल नसल्याची खंत व्यक्त केली. अभिनेत्याने खुलासा केला की, ते गेल्या 7-8 वर्षांपासून त्याच्या मुलाला मिस करत आहे. शुभंकर मिश्रा यांच्याशी संवाद साधताना अनुपम म्हणाले की, 'मला पूर्वी असे फारसे वाटत नव्हतं, पण गेल्या सात-आठ वर्षांपासून मला असं वाटत आहे. असं नाही की मी सिकंदरवर खूष नाही, पण मला वाटते की मुलाला मोठं होताना पाहून आनंद होतो. बाँडिंग पाहून आनंद होतो. हे एक प्रामाणिक उत्तर आहे. मी याचं उत्तर देणे टाळू शकतो, पण मला तसं करायचं नाही. माझ्या आयुष्यातील ही शोकांतिका नाही. मला कधी कधी वाटतं ती चांगली झालं असतं.'
ते पुढे म्हणाले की, त्यांना याआधी असं कधीच वाटलं नव्हतं, पण किरण आणि सिकंदर व्यस्त असल्याने त्यांना स्वतःच्या मुलाची जास्त आठवण येऊ लागली आहे. वयाच्या 50-55 नंतर त्यांना शून्यता जाणवू लागली आहे. जेव्हा ते त्याच्या मित्रांच्या मुलांना पाहतो तेव्हा ते मुलांना मिस करतात. अनुपम मुलांसाठी अनुपम खेर फाउंडेशन ही संस्था देखील चालवतात, हे खूप कमी लोकांना माहितीय.
अनुपम खेरच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ते कंगना राणौतच्या इमर्जन्सी चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, पण CBFC कडून मंजुरी न मिळाल्यामुळे तो पुढे ढकलण्यात आला. मात्र, आता या चित्रपटाला प्रमाणपत्र मिळालं असून रिलीजची तारीख लवकरच जाहीर होणार केली जाणार आहे.