अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या कोरोनाच्या विळख्यातून बाहेर

देशभरातील लाखो चाहते बच्चन कुटुंबीय कोरोनातून लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करत आहेत.   

Updated: Jul 27, 2020, 04:09 PM IST
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या कोरोनाच्या विळख्यातून बाहेर

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चनला डिस्चार्ज मिळाला असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघींवर मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर संपूर्ण बच्चन कुटुंबीयांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या या तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

परंतु, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्य बच्चन यांना होम क्वारंटाईन करुन त्यांच्यावर उपचार सुरु झाले होते. पण १७ जुलै रोजी ऐश्वर्या  आणि आराध्याला ताप आल्यामुळे त्यांना देखील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

दरम्यान, महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर अजूनही नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. देशभरातील लाखो चाहते अमिताभ बच्चन कोरोनातून लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करत आहेत. अमिताभ बच्चनही उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत.