ऐश्वर्या पुन्हा होणार आई? अभिषेकचं ट्विट

बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ड ऐश्वर्या राय सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

Updated: Jan 22, 2020, 11:17 PM IST
ऐश्वर्या पुन्हा होणार आई? अभिषेकचं ट्विट

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ड ऐश्वर्या राय सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. त्याला  कारण देखील तसचं आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या पुन्हा आई होणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. नुकताच अभिनेता अभिषेक बच्चनने एक ट्विट केलं आहे. त्यामुळे आराध्यासोबत खेळायला भाऊ किंवा बहीण येईल असा अंदाज चाहत्यांनी लावला होता. 

'मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी एक सरप्राईझ आहे.' असं ट्विट अभिषेकने केलं होतं. त्यामुळे सोशल मीडियावर ऐश्वर्या गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. शिवाय त्याच्या या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांनी रीट्विट करत अभिषेकला अनेक प्रश्न विचारले. 

पण काही वेळातच अभिषेकने 'झुंड' चित्रपटाचा टीझर शेअर करत यासर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 'झुंड' चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. नागराज मंजुळेच्या दिग्दर्शनात साकारलेला 'झुंड' हा विजय बारसे यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ज्यांनी 'स्लम सॉकर'ची सुरुवात केली होती.

तर अभिषेक देखील त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. 'बॉब बिस्बास' आणि 'बिग बुल' या  दोन चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.