अजय एलियानाचे रेड सिनेमाचे प्रमोशन!

 बॉलिवूड अभिनेता अजय देवगण लवकरच रेड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Updated: Mar 7, 2018, 08:16 AM IST
अजय एलियानाचे रेड सिनेमाचे प्रमोशन! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण लवकरच रेड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनला त्याने सुरूवात केली आहे. त्यासाठी त्याने टी.व्ही. वरील रियालीटी शो सुपर डान्सर २ च्या सेटवर हजेरी लावली.

अजयची खास भूमिका

यावेळी सिनेमाची प्रमुख अभिनेत्री इलियाना डिक्रूजही अजयसोबत होती. या सिनेमात अजय युपी च्या एका डेप्युटी कमिशनरची भूमिका साकारत आहे. रेड सिनेमात सौरभ शुक्ला खलनायकाच्या भूमिकेत आहे.

या दिवशी होणार प्रदर्शित

रेड हा सिनेमा १६ मार्चला प्रदर्शित होईल. भूषण कुमार, कृषण कुमार, कुमार मंगत आणि अभिषेक पाठक यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर सिनेमाचे दिग्दर्शन कुमार गुप्ता यांनी केले आहे.

लोकप्रिय डायलॉग

सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. यातील अजयचा एक डायलॉग फारच लोकप्रिय ठरला. तो असा की, '७ साल में मेरे ४९ ट्रांसफर हुआ है, जब तक 50वां नहीं हो जाता, इस रूल की आदल डाल लो.'

अजय-एलियानाची जोडगोळी

अजय आणि इलियानाचा एकत्र असा हा सातत्याने दुसरा सिनेमा आहे.