अक्षय कुमारने सगळ्यांसमोर परिणीती चोप्राची उडवली खिल्ली

टीव्ही इंडस्ट्रीचा लोकप्रिय रिएलिटी शो हुनरबाजमध्ये, स्टार्स त्यांच्या आगामी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी दर आठवड्याला येतात.

Updated: Mar 14, 2022, 02:22 PM IST
अक्षय कुमारने सगळ्यांसमोर परिणीती चोप्राची उडवली खिल्ली title=

मुंबई :  टीव्ही इंडस्ट्रीचा लोकप्रिय रिएलिटी शो हुनरबाजमध्ये, स्टार्स त्यांच्या आगामी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी दर आठवड्याला येतात. यावेळी अक्षय कुमार त्याच्या 'बच्चन पांडे' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये पोहोचला. या शोमध्ये अक्षयसोबत क्रिती सेननही पोहचली होती. आता यादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये खिलाडी कुमार परिणीती चोप्राची खिल्ली उढवताना दिसत आहे.

अक्षय कुमार कुठेही असला तरी त्याला संधी मिळेल तेव्हा तो पाय खेचतो हे आता सर्वांनाच माहीत आहे. असाच काहीसा प्रकार यावेळी घडला. व्हिडिओमध्ये परिणीती चोप्रा आणि करण जोहर एकत्र गाणं गाताना दिसत आहेत. गाणं ऐकल्यानंतर अक्षय कुमार प्रतिक्रीया देतो.

या व्हिडिओमध्ये परिणीती 'कुछ कुछ होता है' हे गाणं गाताना दिसत आहे.  ज्यामध्ये करण जोहरही तिला कोरस देतो. गाण्यानंतर, करण परिणीतीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की, मुलीला जे काही शिकवलं गेलं ते अप्रतिमपणे गायलं आहेस. हे सगळं पाहून अक्षय थांबत नाही आणि तो म्हणतो की, परिणीती भारी आहे. एकीकडे करण जोहरचा हात आहे. तर एकीकडे चोप्रा जींचा हात आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यानंतर सगळे जोरजोरात हसायला लागतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर लोकांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. अक्षयच्या आगामी 'बच्चन पांडे' या चित्रपटाबाबत बोलायचं झालं तर अक्षय व्यतिरिक्त यात क्रिती सेनॉन, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अभिमन्यू सिंग आणि जॅकलीन फर्नांडिस दिसणार आहेत. नाडियादवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंट निर्मित, हा चित्रपट 18 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.