मुंबई : अभिनेता आणि दिग्दर्शक नीरज वोरा यांचे गुरूवारी पहाटे निधन झाले. त्यानंतर खिलाडी अक्षय कुमारने ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. मी कॉमेडी चित्रपटात त्यांच्यामुळे आलो, ते अत्यंत प्रतिभाशाली होते, असे अक्षयने म्हटले आहे.
अक्षयने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "मी कॉमेडीमध्ये येण्याच्या मुख्य कारणांपैकी एक, बहुआयामी प्रतिभाशाली व्यक्ती, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता नीरज ओरा यांच्या निधनाची बातमी ऐकून मला दुःख होत आहे. त्यांच्या स्वतःच एक चित्रपट उद्योग होता. त्यांच्याकडून खूप काही शिकलो. भगवान त्यांच्या आत्म्याला शांती देवो."
One of the main reasons behind my foray into comedy, saddened to hear about the demise of #NeerajVora a multi-talented man, writer, director, actor...a mini industry by himself, learnt so much from him. RIP
— Akshay Kumar (@akshaykumar) December 14, 2017
वोरा यांच्या कुटुंबातील सदस्याने त्यांच्या निधनाची बातमी दिली. गेल्या वर्षभरापासून ते कोमात होते. अक्षय आणि वोरा यांनी ‘अवारा पागल दीवाना’, ‘दीवाने हुए पागल’, ‘अजनबी’, ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’या चित्रपटात एकत्र काम केले.