मुंबई : कलर्सवरील 'बिग बॉस ११' शो वेगवेगळ्या कारणानी चर्चेत आहे. खासकरून बिग बॉसच्या घरातील हिना खान, शिल्पा शिंदे आणि अर्शी खान यांच्याबद्दल नेहमी बातम्या येत असतात.
पण ही बातमी वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
दरवर्षीप्रमाणे गुगलची टॉप ट्रेंडिंग कॅटेगरी समोर आली आहे. यामध्ये धक्कादायक नावे समोर आली आहेत.
या लिस्टमध्ये बॉलिवूड स्टार सनी लिऑनी सर्वात टॉपला आहे. तर अर्शी खानला त्यानंतर सर्वाधिक सर्च केल्याचे दिसून येत आहे. अर्शीच्या फॅन्ससाठी ही आनंदाची बातमी आहे. हिना खान, शिल्पा शिंदेसारख्या पॉप्यूलर टीव्ही सेलिब्रेटी असताना अर्शीने या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.
सर्वसाधारण म्हणून एन्ट्री केलेल्या अर्शीने आपली बोलण्या-वागण्याची पद्धत, पेहराव याने पॉप्यूलर सेलिब्रेटींना मागे टाकले आहे. बिग बॉसमधील गुगलवर सर्वाधिक सर्च झालेली हस्ती बनली आहे.
बिग बॉसच्या बाहेरचे लोक अर्शीबद्दल जास्त माहिती मिळवू इच्छित आहेत. तिचे वादग्रस्त राहणीमान तिच्या सर्च होण्याचे कारण मानले जात आहे.
अर्शीनंतर सर्वात जास्त सर्च सपना चौधरीला केले. ती तिसऱ्या नंबरवर असून बिग बॉसमधून बाहेर आहे. पण शोमधून तिने जबरदस्त फेम मिळवले. शिल्पा शिंदे यामध्ये ७ व्या तर बंदगी कालरा ८ व्या स्थानी आहे.
१) सनी लियोनी
२) अर्शी खान
३) सपना चौधरी
४) विद्या वॉक्स
५) दिशा पटानी
६)सुनील ग्रोवर
७)शिल्पा शिंदे
८)बंदगी कालरा
९) सागरिका घाटगे
१०) राणा दग्गुबती