अक्षयकुमार आणि रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाचा थक्क करणारा मेकिंग व्हिडिओ व्हायरल!

 साऊथचा सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार  '2.0' या आगामी चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत.  

Updated: Aug 26, 2017, 10:34 AM IST
अक्षयकुमार आणि रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाचा थक्क करणारा मेकिंग व्हिडिओ व्हायरल!  title=

मुंबई :  साऊथचा सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार  '2.0' या आगामी चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत.  

चित्रीकरणादरम्यानचा मेकिंग व्हिडिओ नुकताच रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये दोघांचाही खास लूक दिसत आहे. 

रजनीकांत यांनी यापूर्वी 'रोबोट' सिनेमात अशाप्रकारचा लूक केला होता. पण अक्षय कुमार अशा खलनायकी भूमिकेत पहिल्यांदा दिसत आहे. त्यामुळे रसिकांमध्येही या चित्रपटाविषयीचे कुतुहूल वाढले आहे. या भूमिकेसाठी मेकअप करतानाही कलाकारांना तासनतान एकाच जागी बसावे लागत असे.  

या चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सीन्ससाठीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.  '2.0' चित्रपटाचे बजेट सुमारे  ४००कोटी आहे. सोबतच या चित्रपटाच्या मार्केटींग साठी १५० करोड खर्च करण्यात येणार आहे.

'हा केवळ चित्रपट नाही तर लाईफटाईम लक्षात राहिल असा अनुभव होता. ' असहा स्वरूपाच्या भावना अक्षयकुमारने ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत. 

 

 '2.0'चित्रपटाच्या मेकिंगच्या व्हिडिओ लायका प्रोडक्शनने यु ट्युब चॅनवर अपलोड केले आहे. अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा हा आगामी चित्रपट दिवाळीत रसिकांच्या भेटीला येणार होता परंतू पोस्ट प्रोडक्शनचे काही काम राहिल्याने या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारीत रिलीज करण्यात येईल.