स्वप्नील जोशीचा मुलगा त्याच्या या अगदी खास मित्रासोबत करणार वाढदिवसाचे सेलिब्रेशन

अभिनेता स्वप्नील जोशी दुसर्‍यांदा बाबा झाला आहे.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 10, 2017, 04:01 PM IST
स्वप्नील जोशीचा मुलगा त्याच्या या अगदी खास मित्रासोबत करणार वाढदिवसाचे सेलिब्रेशन title=

मुंबई : अभिनेता स्वप्नील जोशी दुसर्‍यांदा बाबा झाला आहे.

७ डिसेंबर रोजी स्वप्नीलला मुलगा झाल्याची माहिती ट्विटरवरून त्याने जाहीर केली आहे. त्यानंतर स्वप्नीलच्या चाहत्यांनी आणि मित्रपरिवारातील लोकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.  

स्वप्नीलच्या खास मित्राचा वाढदिवस 

ट्विटरवर स्वप्नील जोशीने शुभेच्छांचा स्वीकार करताना खास लीना आणि बाळ सुखरूप असल्याची माहिती दिली. अभिनेता अली असगर हा स्वप्नील जोशीच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. अलीचा वाढदिवसदेखील ७ डिसेंबर दिवशी असतो.  

 

अलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना स्वप्नीलने ७/१२ ही तारीख आता तुझ्यासोबतच माझ्यासाठीदेखील खास असल्याची माहिती दिली आहे. या ट्विटवर अलीने देखील खास रिप्लाय दिला आहे.  

अली  असगरचा रिप्लाय  

 

अली असगरने स्वप्नीलला रिप्लाय करताना लिहले की आता काका-पुतण्या ७ डिसेंबरला एकत्र केक कापणार ..