पाकिस्तानची सून बनायला आलिया सज्ज

आलिया भटकडे नेहमीच चुलबुली अभिनेत्री म्हणून बघितलं जातं. पण हायवे, उडता  पंजाब सारख्या सिनेमांमध्ये डिग्लॅमरस भूमिका करत आपली दखलं घ्यायला भाग पाडलं. आता तर आलिया अजून एक पाऊल पुढे टाकत आणखी एका धाडसी भूमिकेत दिसणार आहे.

Updated: Aug 11, 2017, 05:24 PM IST
पाकिस्तानची सून बनायला आलिया सज्ज  title=

मुंबई : आलिया भटकडे नेहमीच चुलबुली अभिनेत्री म्हणून बघितलं जातं. पण हायवे, उडता  पंजाब सारख्या सिनेमांमध्ये डिग्लॅमरस भूमिका करत आपली दखलं घ्यायला भाग पाडलं. आता तर आलिया अजून एक पाऊल पुढे टाकत आणखी एका धाडसी भूमिकेत दिसणार आहे.

कठीण मिशनवर आलिया

बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट लवकरचं मेघना गुलजारच्या 'राजी' या सिनेमात दिसणार आहे... हा सिनेमाचा विषय वादग्रस्त मु्द्दा ठरलाय. 

राजी हा सिनेमा हरिंदर सिक्काची कादंबरी कॉलिंग सेहमत वर आधारित असणार आहे. आलिया सिनेमात काश्मिरी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही मुलगी १९७१ साली झालेल्या भारत-पाक युद्धादरम्यान एका पाकिस्तानी आर्मी ऑफिसरबरोबर लग्न करते... असं काहीसं या सिनेमाचं कथानक आहे. या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी आलिया सध्या कश्मिरमध्ये तळ ठोकून आहे. सिनेमातील आलियाच्या लूकवरही मेघना प्रचंड मेहनत घेत असून आतापर्यंतचा आलियाचा कधीही न बघितलेला अंदाज या सिनेमात बघायला मिळणार आहे. या सिनेमात आलियाच्या अपोझिट मसान फेम अभिनेता विकी कौशल दिसणार आहे.

चॅलेंजिंग भूमिका

'स्टुडंट ऑफ द ईयर' या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात करणा-या आलियाने हायवे आणि उडता पंजाब या सिनेमात वेगळे रोल करुन सगळ्यांनाच धक्का दिला होता. कमर्शियल सिनेमातील भूमिका आलिया जेवढ्या सहज करते तितक्याच ताकदीने ती 'ऑफ बिट रोल'ही लिलया करताना दिसतेय. 

करण जोहरने स्टुडंट ऑफ द ईयर या सिनेमातून आलिया भटला लॉन्च केलं तेव्हा आपल्या नटखट आणि बालिश स्वभावासाठी आलिया ओळखली जाऊ लागली. पण मोहित सूरीच्या दिग्दर्शनात बनलेल्या 'टु स्टेट्स' या सिनेमात आलियाने केलेल्या धीरगंभीर अभिनयाने तिची दखल घ्यायला लावली... आलियाच्या करिअरसाठी टर्निंग पाईंट ठरला इम्तियाज अली दिग्दर्शित हायवे हा सिनेमा... या सिनेमात ग्लॅमरस लूकमधील आलिया बघून तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. या सिनेमातील आलियाच्या अदाकारीने ती लंबी रेस का घोडा असल्याचं सिद्ध झालं. 

हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, शानदार, कपूर अॅण्ड सन्स, बद्रिनाथ की दुल्हनिया या सिनेमात आलियाचा मॉडर्न अंदाज तिच्या चाहत्यांना दिसला तर उडता पंजाब या सिनेमात पुन्हा एकदा हटके रोलमध्ये आलिया दिसली. बिहारी मुलीच्या भूमिकेतील आलिया या सिनेमात चांगलाचं भाव खाऊन गेली.

'डियर जिंदगी'मध्ये मध्ये प्रेमात नैराश्य आलेल्या युवतीच्या भूमिकेत आलियाने बॉलिवूडचा किंग शाहरुख खानवर पण अभिनयात मात केली. त्यामुळे सुरुवातीला चुलबुली नायिका अशी ओळख असलेल्या आलियाने आज बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेचं आलिया आता या सिनेमात कायं वेगळं करते याकडेचं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे..