रणबीर-आलियाचा या महिन्यात साखरपुडा

कधी करणार साखरपुडा 

रणबीर-आलियाचा या महिन्यात साखरपुडा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर - आलिया भट्ट लवकरच साखरपुडा करून त्यांच्या नात्याला नाव देणार असल्याचं म्हटलं जात आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कपूर कुटुंबातील चौथी पिढी अभिनेता रणबीर लोकप्रिय निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या मुलीशी आलियाशी लग्न करणार आहे. 

गेल्या वर्षापासून हे दोघं एकमेकांना डेट करत असून यावर्षी 2019 मध्ये जून महिन्यात साखरपुडा करत असल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. नुकतेच दोघं पण न्यूयॉर्कमध्ये नवीन वर्ष साजरं करून परतले आहेत. यावेळी तिच्यासोबत ऋषी कपूर, नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर, भरत साहनी आणि मुलगी समारा म्हणजे ऋषी कपूर यांच संपूर्ण कुटुंब होतं. 

रणबीरच्या बहिणीने रिद्धिमाने आलियाला गिफ्ट म्हणून अंगठी दिली असून त्यावर 'AR' असं लिहिलं आहे. एवढंच नव्हे तर रणबीरची आई अनेकदा आलिया आणि तिच्या आईसोबत एकत्र दिसली आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. 

दोन्ही कुटुंबांनी जूनमध्ये साखरपुड्यासाठी परवानगी दिली असून याचवर्षी शेवटच्या महिन्यात हे दोघं विवाहबंधनात अडकू शकतात अशी देखील माहिती मिळाली आहे. 

अंगठीच्या अगोदर रिद्धिमाने आलियाला एक सुंदर हिऱ्यांचा महागडा ब्रेसलेट देखील गिफ्ट केला असून आता रिद्धिमा या दोघांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असल्याचं समजत आहे.