रणबीर जवळ असल्यावर आलिया नक्की कशी वागते? स्वतः अभिनेत्रीकडून खासगी क्षण समोर

खसगी क्षणांबद्दल खुद्द आलिया सांगते, 'तो माझ्या जवळ असतो तेव्हा...'  

Updated: Feb 27, 2022, 02:45 PM IST
रणबीर जवळ असल्यावर आलिया नक्की कशी वागते? स्वतः अभिनेत्रीकडून खासगी क्षण समोर title=

मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि क्यूट कपलपैकी एक म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट. दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. कायम एकमेकांसोबत असणारं हे कपल लग्न कधी करणार? असा प्रश्न चाहत्यांकडून सतत विचारण्यात येत आहे. पण आलिया सध्या लग्नाचा विचार नाही, वेळ आली की लग्न करू असं सांगत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.  पण दोघेही सोशल मीडियावर प्रेम व्यक्त करताना दिसतात. 

एवढंच नाही तर दोघे एकमेकांना कामाबद्दल प्रेरणा देताना देखील दिसतात. सध्या आलियाचा गंगूबाई काठियावाडी सिनेमा तुफान चर्चेत आहे. दरम्यान तिने रणबीर आणि तिच्या नात्याबद्दल मोठी घोषणा केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instagram (@instagram)

आलिया म्हणाली, 'यावेळी मी चांगल्या आणि सुरक्षित जागेत आहे. ज्या रिलेशनशिपमध्ये मी सध्या आहे, त्याठिकाणी मी स्वतःला सुरक्षित समजते...' आलिया आणि रणबीरच्या नात्याची चर्चा कायम सर्वत्र रंगलेल्या असतात. 

लवकरच या सिनेमात दिसणार कपल 
वर्क फ्रंटवर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र' सिनेमात दिसणार आहे. ज्यामध्ये रणबीर कपूर एका वेगळ्या लूकमध्ये दिसला. सिनेमात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय देखील आहेत. सिनेमा अयान मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला असून 9 सप्टेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.