Allu Arjun ने चाहत्यांसाठी फेटाळली कोट्यवधींची ऑफर, 'ते' काम करण्यास नकार

'झुकेंगा नही...' कोट्यवधींच्या ऑफर समोर Allu Arjun ची भूमिका.. त्याच्या निर्णयानंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण   

Updated: Apr 21, 2022, 11:19 AM IST
Allu Arjun ने चाहत्यांसाठी फेटाळली कोट्यवधींची ऑफर, 'ते' काम करण्यास नकार title=

मुंबई : 'झुकेंगा नाही साला...' असं म्हणणारा अभिनेता अल्लू अर्जून कधीचं चेकवर वाढते शून्य पाहून स्वतःचे तत्त्व विसरत नाही. 'पुष्पा' फेम अभिनेत्याने पुन्हा असचं काही केलं आहे. अल्लू अर्जुनशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अल्लू अर्जुनने कोट्यवधींच्या ऑफर फक्त आणि फक्त चाहत्यांच्या आनंदासाठी नाकारली आहे. अल्लू अर्जुनच्या या निर्णयानंतर चाहत्यांच्या मनात अभिनेत्याविषयी आदर आणखी वाढला आहे.

अल्लू अर्जुनला एका तंबाखूची टीव्ही जाहिरात करण्याची ऑफर मिळाली. या जाहिरातीसाठी अल्लू अर्जुनला भरघोस फी दिली जात होती. पण पुष्पा राज कधीही आपल्या तत्त्वांपुढे झुकायला शिकलेला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  अभिनेता म्हणतो की, तो त्याच्या चाहत्यांवर खूप प्रेम करतो. लोकांची दिशाभूल व्हावी म्हणून अभिनेत्याला अशी कोणतीही जाहिरात करायला आवडणार नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अल्लू अर्जुन त्याच्या टीव्ही जाहिराती जबाबदारीने निवडतो. केवळ चेकवर वाढणारे शून्य पाहून तो कोणत्याही जाहिरातीची ऑफर स्वीकारत नाही. अल्लू अर्जुनच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, तो कधी तंबाखूचं सेवन करत नाही. 

त्यामुळे, इतर कोणालाही प्रेरित करण्यासाठी तंबाखूची जाहिरात करणार नसल्याची अभिनेत्याची भूमिका आहे. आल्लू अर्जुनच्या या निर्णयानंतर चाहत्यांनी त्याच्या महत्त्वाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यामुळे अल्लू अर्जुन सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.