अमिताभ यांची मुलगी श्वेता नंदाचे अभिनयात पर्दापण...

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा लवकरच छोट्या पडद्यावर पर्दापण करणार आहे.

Updated: May 22, 2018, 10:03 AM IST
अमिताभ यांची मुलगी श्वेता नंदाचे अभिनयात पर्दापण... title=

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा लवकरच छोट्या पडद्यावर पर्दापण करणार आहे. आणि खास गोष्ट ही की, ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे.

Shweta Nanda, Amitabh Bachchan, Kalyan Jewelers

सिनेमा, मालिका नाही तर एका जाहिरातीत श्वेता, वडील अमिताभ यांच्यासोबत झळकणार आहे. दोघांनीही या जाहिरातीचे शूटिंग पूर्ण केले आहे. ही जाहिरात आहे कल्याण ज्वेलर्सची. अमिताभ बच्चन २०१२ पासून कल्याण ज्वेलर्सच्या ग्लोबल ब्रॅंड अॅँबेसेडर आहेत.

Shweta Nanda, Amitabh Bachchan, Kalyan Jewelers
जाहिरातीत श्वेताचा लूक अतिशय साधा आहे. तर बीग बी ही सामान्य वेशात दिसत आहेत.

Shweta Nanda, Amitabh Bachchan, Kalyan Jewelers
ही जाहिरात जुलैमध्ये ऑन एअर येईल. या जाहिरातीची निर्मिती मल्याळममध्येही करण्यात आली असून त्यात श्वेताऐवजी मंजू वॉरिअर दिसेल. 

Shweta Nanda, Amitabh Bachchan, Kalyan Jewelers

Shweta Nanda, Amitabh Bachchan, Kalyan Jewelers