बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी अलीकडेच कौन बनेगा करोडपती या रिअॅलिटी शोच्या शूटिंगदरम्यान मोठा अपघात झाल्याचा खुलासा त्यांच्या ब्लॉगमध्ये (Blog) केला आहे. अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, केबीसीच्या (KBC) शूटिंगदरम्यान अपघातात त्यांच्या पायाला मोठा दुखापत झाली होती. या अपघात अमिताभ यांच्या पायाची नस कापली गेली होती. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. (Amitabh Bachchan accident happened on the sets of KBC 14)
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितले की, त्यांच्या जखमेवर काही टाके घालण्यात आले जेणेकरून रक्तस्त्राव थांबवता येईल. मात्र, अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या चाहत्यांना सांगितले आहे की, ते आता पूर्णपणे बरे आहेत आणि काळजी करण्यासारखे काही नाही. अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांना ही दुखापत कशी झाली याबाबत सांगितले आहे.
अमिताभ बच्चन यांचा अपघात कसा झाला?
बिग बींनीही ब्लॉगमध्ये सांगितले की त्यांना ही दुखापत कशी झाली. सेटवरील एक धातूचा तुकडा त्यांच्या पायाला घासला गेला आणि त्यामुळे त्यांच्या पायाची नस कापली गेली. छोट्या ऑपरेशननंतर त्यावर टाके घालण्यात आले, त्यानंतर रक्तस्त्राव थांबला, असे अमिताभ म्हणाले.
सेटवर घेतली जाते विशेष काळजी
दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितले की, ते केबीसीच्या सेटवर जेवढा वेळ घालवतात, त्यादरम्यान त्यांची विशेष काळजी घेतली जाते. अमिताभ बच्चन नुकतेच 80 वर्षांचे झाले आहेत आणि या खास प्रसंगी केबीसीच्या टीमने एका खास एपिसोडचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये अभिषेक बच्चन आणि जया बच्चन यांचाही सहभाग होता.