अमिताभ आणि इमरान स्टारर 'चेहरे' सिनेमावर कोरोनाचं सावटं

कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सिनेमा निर्मात्यांचा मोठा  निर्णय  

Updated: Mar 30, 2021, 04:33 PM IST
अमिताभ आणि इमरान स्टारर 'चेहरे' सिनेमावर कोरोनाचं सावटं title=

मुंबई : मुंबई आणि दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याचा परिणाम आता पुन्हा बॉलिवूड क्षेत्रावर होताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे अभिनेता अमिताभ बच्चन आणि इमरान हाशमी यांचा आगामी सिनेमा 'चेहरे' बद्दल निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 'चेहरे' सिनेमा 9 एप्रिल रोजी रूपेरी पडद्यावर प्रदर्शित करण्यात येणार होता.

परंतु कोरोना व्हायरसचा वाढता आकडा पाहता सिनेमा प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. पण आता 'चेहरे'  सिनेमा कधी प्रदर्शित करण्यात येणार हे अद्याप सांगण्यात आलं नाही.  खुद्द इमरानने  याबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली आहे. 'प्रेक्षकांची  सुरक्षा आमच्यासाठी अधित महत्त्वाची आहे. सिनेमाला मिळालेल्या प्रेमाबद्दल खुप आभार..' असं तो म्हणाला.

शिवाय लवकरच सिनेमागृहात भेटू... तो पर्यंत सुरक्षित राहा.... असं आवाहन इमरानने सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे. सांगायचं झालं तर सिनेमा गेल्या वर्षी 17 जुलै रोजी महिन्यात प्रदर्शित होणार होता, पण कोरोनामुळे सिनेमा प्रदर्शित करण्यात आला नाही. आता पुन्हा कोरोनामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 

बिग बी आणि इमरान शिवाय सिनेमात अभिनेत्री रिया चक्रवर्ती देखील मुख्य भुमिकेत दिसणार आहे. सिनेमात अमिताभ बच्चन वकिलाची भुमिका साकारणार आहेत. पण कोरोनामुळे आता 'चेहरे' सिनेमासाठी प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.