ऑपरेशनची 'ती' बातमी खोटी! अमिताभ ठणठणीत; शुक्रवारी रात्री स्टेडियममध्ये मॅच पाहताना झाले स्पॉट

Amitabh Bachchan Health Fake News : 15 मार्च रोजी अमिताभ बच्चन यांच्या तब्बेतीबाबत मोठी बातमी समोर आली होती. आज ती बातमी खोटी ठरली आहे. बिग बी अगदी एकदम फिट पाहायला मिळाले. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 16, 2024, 10:45 AM IST
ऑपरेशनची 'ती' बातमी खोटी! अमिताभ ठणठणीत; शुक्रवारी रात्री स्टेडियममध्ये मॅच पाहताना झाले स्पॉट title=

बॉलिवुडचे शंहशाह अमिताभ बच्चन यांच्या अँजियोप्लास्टीच्या बातम्यांना 'फेक न्यूज' सांगण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर ते रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी देखील खोटी आहे. 15 मार्च रोजी अमिताभ बच्चन यांच्या पायात रक्ताच्या गुठल्या जमा झाल्या असून आर्टरी ब्लॉक झाल्यामुळे अँजियोप्लास्टीकरिता अमिताभ बच्चन यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर सोशल मीडियावर चाहते बिग बी यांच्यासाठी चिंता व्यक्त करु लागले. 

अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी आल्यानंतर काही तासात संध्याकाळी अमिताभ बच्चन एका कार्यक्रमात दिसले. बिग बी ठाण्याच्या दादोजी कोंडादेव स्टेडियमवर इंडियन स्ट्रीट प्रीमियलर लीग (ISPL) च्या फायनल सामन्या दरम्यान दिसले. माझी मुंबई विरुद्ध टायगर्स ऑफ कोलकाता असा सामना होता. यावेळी अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन दोघेही उपस्थित होते.      

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये अमिताभ बच्चन स्टेडियममधून बाहेर येताना दिसले. तेव्हा गर्दीतून एका व्यक्तीने बिग बी यांना त्यांच्या तब्बेतीबद्दल विचारलं. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी हाताना इशारा केला की, सगळं काही ठिक आहे. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, ती Fake News आहे. 

त्यामगे बिग बी यांचं ट्विट

या ट्विटमुळे चाहत्यांना बिग बी यांच्या तब्बेतीची बातमी वाटली खरी. या ट्विटमध्ये अमिताभ बच्चन यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ही कृतज्ञता व्यक्त का केली असा समज अनेक चाहत्यांचा झाला.

बिग बींचे आजारपणाबाबत 

'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्या सेटवर अमिताभ जखमी झाले. KBC 14 च्या शूटिंगदरम्यान त्याच्या पायाची नसा कापली गेली होती. ते दोनदा कोविड पॉझिटिव्ह होते. दिवाळी 2022 च्या आधीच अमिताभ बच्चन जखमी झाले. दिवाळीपूर्वीच त्यांच्या पायाची नस कापल्याची माहिती समोर आली होती. तिथेही निष्काळजीपणा झाला आणि बिग बींना हिपॅटायटीस बी ची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त देण्यात आले. अभिनेत्याचे यकृत देखील 75 टक्के वेळेत काम करणे थांबवले आहे. बिग बी आधीच अस्थमा, यकृताची समस्या आणि न्यूमोनियाने त्रस्त होते. कुलीच्या सेटवर पुनीत इस्सारला ठोसे मारण्यात आले, त्याचा जीव वाचला.