अमिताभ बच्चन यांना मराठी चित्रपटाची भूरळ, ट्वीट करत म्हणाले "माझ्या या अत्यंत प्रिय..."

बिग बी अमिताभ बच्चन यांना मराठी चित्रपटाला दिलेल्या शुभेच्छांमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Updated: Oct 4, 2022, 03:27 PM IST
अमिताभ बच्चन यांना मराठी चित्रपटाची भूरळ, ट्वीट करत म्हणाले "माझ्या या अत्यंत प्रिय..."

Amitabh Bachchan Tweet Teaser Of Marathi movie: बिग बी अमिताभ बच्चन यांना मराठी चित्रपटाला दिलेल्या शुभेच्छांमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अभिनेता श्रेयस तळपदेचा बहुचर्चित 'आपडी थापडी' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. उद्या म्हणजेच 5 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांसह कलाकारांमध्येही मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचं बिग बी अमिताभ बच्चन यांनी कौतुक केलं आहे. अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत मराठीत पोस्ट केलं आहे. 

“T 4429 – रोहन विनायक माझ्या या अत्यंत प्रिय मित्रांना, आणि अतिशय सक्षम संगीत दिग्दर्शकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा…”, असे अमिताभ बच्चन यांनी म्हटले.

 ‘आपडी थापडी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे.  श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे हे कलाकार या चित्रपटात आहे. या चित्रपटाचं संगीत आनंद भास्कर, हनीफ शेख आणि रोहन विनायक यांनी केलं आहे.