NCB कार्यालयाबाहेर अनन्या पांडे का रडली?

अभिनेत्री अनन्या पांडे काही वेळापूर्वी एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली. 

Updated: Oct 22, 2021, 10:16 PM IST
NCB कार्यालयाबाहेर अनन्या पांडे का रडली?

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडे काही वेळापूर्वी एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली. अनन्या पांडेला एनसीबीने ड्रग प्रकरणी चौकशीसाठी कार्यालयात बोलावलं होतं. अनन्या पांडे जेव्हा कार्यालयामधून बाहेर पडत होती. तेव्हा ती अस्वस्थ दिसली. आर्यन आणि तिच्या चॅट संदर्भात तिला प्रश्न विचारण्यात आले.

अनन्या पांडे वडिलांचा हात धरून बाहेर पडली
अभिनेत्री अनन्या पांडे चौकशीच्या पहिल्या दिवशी चंकी पांडेसोबत एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली होती. तेव्हा अनन्या पांडेने NCB कार्यालयाबाहेर मीडियाला टाळणं योग्य मानलं. अनन्या पांडेने प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांची सरबत्ती केली आणि पुढी गेली.

अस्वस्थ दिसली अनन्या पांडे
एनसीबी चौकशीनंतर अनन्या पांडेच्या चेहऱ्याची रंगत उडून गेल्या सारखं दिसलं. तिचे डोळेही पाणावलेले दिसले, तिने मान खाली घातली आणि थेट तिथून निघून गेली. अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या कारमध्ये बसली आणि घराकडे रवाना झाली. अनन्या पांडेला एनसीबीने व्हॉट्सअॅप चॅटबद्दल प्रश्न विचारले आहेत. NCB सोमवारी अभिनेत्री अनन्या पांडेची पुन्हा चौकशी करणार आहे. सोमवारी ती पुन्हा NCB कार्यालयात जाणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.