'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाविषयी प्रश्न विचारता अन्नू कपूर, म्हणाले 'हा कोण?'

अन्नू कपूर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 7, 2022, 04:49 PM IST
'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाविषयी प्रश्न विचारता अन्नू कपूर, म्हणाले 'हा कोण?' title=

मुंबई : बॉलिवूडचा मिस्ट पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आमिर सध्या लाल सिंग चड्ढा या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटात आमिरसोबत करीना मुख्य भूमिका साकारताना दिसते. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकतेच 'क्रॅश कोर्स'मध्ये दिसलेले ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांना या चित्रपटाबद्दल विचारण्यात आले आणि त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

अन्नू कपूर यांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. यावेळी अन्नू हे त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेल्या 'क्रॅश कोर्स' या त्यांच्या वेब सीरिजच्या प्रमोशन करतानाचा आहे. त्यानंतर त्यांना आमिर स्टारर 'लाल सिंग चड्ढा' बद्दल विचारण्यात आले आणि अभिनेत्याने उत्तर दिले, 'ते काय आहे? मी चित्रपट पाहत नाही. मला माहित नाही.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे अन्नू कपूर म्हणाले, 'मी चित्रपट पाहत नाही. मला माहित नाही. मी स्वत: चे आणि दुसऱ्यांचे कोणाचेच चित्रपट पाहत नाहीत. मला माहित सुद्धा नाही हा कोण आहे, मग मी तुम्हाला त्याच्याबद्दल कसे सांगू.'

व्हिडिओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'याला माहित नाही की आमिर खान कोण आहे.' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली की "मग तू चित्रपटात काम का करतोस.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'Wow what are acting sir.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'ओव्हर अॅक्टिंगसाठी 200 रुपये कट करा.' दरम्यान, आमिर खान आणि करीना कपूरचा 'लाल सिंह चड्ढा' चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 'फॉरेस्ट गंप' या लोकप्रिय हॉलिवूड चित्रपटाचे हिंदी रूपांतर आहे.