शुभ मंगल सावधान...! साई पल्लवी अडकली लग्नबंधनात?

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी हिची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे.

Updated: Aug 7, 2022, 04:32 PM IST
शुभ मंगल सावधान...! साई पल्लवी अडकली लग्नबंधनात?  title=

मुंबई :  साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी हिची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. आपल्या टॅलेंटच्या जोरावर तिने साऊथ फिल्म इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. सईने 'मारी-2', 'प्रेम' आणि 'लव्ह स्टोरी' सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. साई पल्लवी लवकरच अभिनेता राणा डग्गुबतीसोबत 'वीरता पर्वम' चित्रपटात दिसणार आहे. पण सध्या साई चित्रपटांमुळे नाही तर लग्नामुळे चर्चेत आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, साई पल्लवी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. साईने लवकरात लवकर लग्न करून सेटल व्हावं, अशी अभिनेत्रीच्या पालकांचीही इच्छा होती. त्यामुळेच तिचे कुटुंबीय साईसाठी योग्य वराच्या शोधातही होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सईचा आगामी चित्रपट वीरता पर्व रिलीज झाल्यानंतर ती लग्न करू शकते अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. पण या सगळ्या चर्चा दरम्यान अभिनेत्रीने अखेर लग्नगाठ बांधल्याचं चाहते म्हणत आहेत. 

अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे. त्यामुळेच साईच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पण आम्ही तुम्हाला आता या व्हिडिओमागचं सत्य सांगणार आहोत. 

या व्हिडिओमध्ये साईने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केल्याचं दिसत आहे. याचबरोबर तिच्या गळ्यात एक मंगळसूत्रही दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ साईच्या फॅनपेज वरुन शेअर करण्यात आला आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, अभिनेत्रीची लग्नाबाबतची चर्चा पूर्णपणे खोटी असून हा व्हिडिओ शूटिंग दरम्यानचा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

साई पल्लवी एक मेडिकलची विद्यार्थिनी आहे. मात्र, तिने चित्रपटांचा मार्ग निवडला. टॉलिवूड चित्रपटांमध्ये तिने फार कमी वेळात यश मिळवलं आहे. आपल्या साधेपणामुळे आणि उत्कृष्ट अभिनयामुळे साई नेहमीच लोकांची आवडती अभिनेत्री राहिली आहे. साई शेवटची नागा चैतन्यसोबत 'लव्ह स्टोरी' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली.