'अभिनेत्यानं हेल्दी डायटच्या नावावर रोज 2 लाख रुपये...', अनुराग कश्यपचा मोठा खुलासा

Anurag Kashyap : अनुराग कश्यपनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कलाकार त्यांचं मानधन आणि त्यासोबत त्यांच्या मागण्या यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 22, 2024, 12:42 PM IST
'अभिनेत्यानं हेल्दी डायटच्या नावावर रोज 2 लाख रुपये...', अनुराग कश्यपचा मोठा खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Anurag Kashyap : गेल्या अनेक दिवसांपासून कलाकार हे त्यांच्या मानधनामुळे चर्चेत असतात. कलाकारांच्या मानधनामुळे चित्रपटाचं बजेट वाढतं. अशात दिग्दर्शकांना इतरांसाठीचे पैसे कमी करावे लागतात. याशिवाय कलाकारांच्या इतर काही मागण्या असतात ज्या चर्चेत असतात. करण जोहर आणि फराह खाननंतर आता अनुराग कश्यपनं अशा प्रकारच्या डिमांडवर खुलासा केला आहे. त्यानं सांगितलं की एक कलाकारानं त्याच्यासोबत चित्रपट करण्यासाठी अशा शेफची मागणी केली होती जो रोज जेवण बनवण्याचे 2 लाख रुपये फी घ्यायचा. 

अनुराक कश्यपनं 'जेनिस सिक्वेरा'ला दिलेल्या एका मुलाखतीत कोणत्याही कलाकाराचं नाव न घेता सांगितलं की 'सगळ्यात घाणेरडी मागणी जी मी ऐकली ती ही होती की एका अभिनेत्यानं मला सांगितलं की एक असा शेफ आहे जो रोज जेवण बनवण्यासाठी 2 लाख रुपये घेतो. तर ते जेवण पाहून असं वाटतं की हे जेवण आहे की चिमणीचं खाणं. किती कमी येतं.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पुढे त्या अभिनेत्याची नक्कल करत अनुराग कश्यप म्हणाला, 'मला हेल्थच्या काही समस्या आहेत. मी फक्त हेच खातो.'

पुढे याविषयी बोलताना अनुरागनं सांगितलं की,'ही निर्माते आणि त्यांच्या एजंटची चूक आहे. मला कळत नाही की निर्माते सेटवर हे सगळं का होऊ देतात. हे माझ्या सेटवर होत नाही.' पुढे अनुरागनं हे देखील सांगितलं की काही हेअर आणि मेकअप आर्टिस्ट हे रोजचे 75 हजार रुपये घेतात. त्यांचं मानधन हे टेक्नीशियनपेक्षा जास्त असते. त्यांनी सांगितलं की जर तो स्वत: हेअर किंवा मेकअप आर्टिस्ट असता तर जास्त श्रीमंत असता.   

गेल्या बऱ्याच काळापासून कलाकारांच्या मानधनाची डिमांड चर्चेत आहे. तर नुकत्याच फिल्म असोसिएशननं देखील कलाकारांच्या मानधनावरून चिंता जाहिर करत एक मीटिंग घेतली होती. 

हेही वाचा : अरमान मलिकने शेअर केलं बेडरुम सीक्रेट, म्हणतो 'दोघींपैकी पहिली पत्नी जास्त...'

इतकंच नाही तर नवाजुद्दीन सिद्दीकीनं देखील यावर रिअॅक्शन दिली होती. त्यानं सांगितलं होतं की 'अनेक गरज नसलेल्या गोष्टींची मागनी असते. जे कलाकार करतात. त्यांना सगळं लग्झरी हवं असतं. मी तर हे सुद्धा ऐकलं आहे की काही कलाकारांकडे 5 व्हॅनिटी व्हॅन असतात. एक जिमिंगसाठी, दुसरी कुकिंगसाठी, तिसरा जेवण करण्यासाठी, एक अंघोळीसाठी आणि एक डायलॉग्सची प्रॅक्टिस करण्यासाठी. हा मुर्खपणा आहे. कोणी पागल असेल जो 5 व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरतो.'