मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा मुलगी वामिकासोबत खूप छान वेळ घालवत आहे. यासोबत ती सोशल मीडियावर देखील ऍक्टिव असते. अनुष्काने नुकताच भाऊ आणि निर्माता करनेश शर्मा आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या दोघांची अनुष्काला खूप आठवण येत आहे. यामध्ये अनुष्काचा आणि करनेशचा लहानपणीचा फोटो आहे. थ्रोबॅक फोटो म्हणतं तिने ही पोस्ट शेअर केली आहे.
या फोटोत दोघं खुर्चीत बसलेले आहेत. टेबलावर वर्तमानपत्र आहेत. अनुष्काने हा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यासोबतच तिने लाल रंगाचा हार्ट इमोजी देखील शेअर केलाय. या अगोदर अनुष्काने करनेश आणि तृप्तीचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ते दोघं बर्फाच्या डोंगरात पोझ देताना दिसत आहे.
अनुष्का शर्मा 'Quala' सिनेमाची निर्मिती करत आहे. या प्रोडक्शन हाऊसचं नाव 'क्लीन स्लेट' आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर दिसणार आहे. तृप्ती डिमरीने या सिनेमासंदर्भातील फोटो पोस्ट केले होते मात्र तिने ते लगेच डिलिट केले. तृप्तीचा अनुष्कासोबतचा दुसरा प्रोजेक्ट आहे. या अगोदर नेटफ्लिक्सवरील 'बुलबुल' मध्ये ती दिसली होती.
अनुष्का सध्या आपले जुने फोटो शेअर करत आठवणींना उजाळा देताना दिसत आहे.
इरफान खान (Irrfan Khan)च्या निधनानंतर आता त्याचा मुलगा बाबिल वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनयात आपलं नशिब आजमावणार आहे. बाबिल लवकरच 'काला' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे बाबिल त्यांच्या वडिलांसारखा अभिनेता म्हणून नाव कमवू शकतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्रा इरफानच्या मुलाला संधी देणार आहे.