अरबाजच्या गर्लफ्रेंडने धरला 'साकी-साकी' गाण्यावर ठेका

मलाइका अरोरा सोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाजच्या आयुष्यात जियोर्जिया एन्ट्री झाली.

Updated: Nov 19, 2019, 05:24 PM IST
अरबाजच्या गर्लफ्रेंडने धरला 'साकी-साकी' गाण्यावर ठेका

मुंबई : अभिनेता दिग्दर्शक अरबाज खानची गर्लफ्रेंड जियोर्जियाने 'साकी-साकी' गाण्यावर चांगलाच ताल धरला आहे. सोशल मीडियावर तिच्या या नृत्य अदा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अभिनेत्री नोरा फतेहीवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. शिवाय आता जियोर्जियाच्या दिलखेच अदांनी चाहत्यांचे मन जिंकले आहे. 

अरबाज आणि जियोर्जियाच्या नात्याच्या चर्चा कायम वाऱ्यासारख्या पसरत असतात. नुकताच झालेल्या अर्पिता-आयुषच्या ५व्या लग्नाच्या वाढदिवसाला दोघे एकत्र झळकले होते. तसं तर या सोहळ्यात अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. परंतु सर्वांच्या नजरा अरबाज-जियोर्जियावर खिळल्या होत्या. जियोर्जियाला लवकरच 'कैरोलाइन कामाक्षी' या वेबसीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 

मलाइका अरोरा सोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाजच्या आयुष्यात जियोर्जिया एन्ट्री झाली. अरबाज खान सध्या मॉडेल जॉर्जियाला डेट करत आहे तर दुसरीकडे मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याच्या चर्चा रंगत आहेत. अरबाज आणि मलायका घटस्फोटानंतरही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मलायका नेहमी खान कुटुंबियांच्या कार्यक्रमात उपस्थित असते.

त्याचप्रमाणे  अर्जुन कपूर आणि मलायका अरोराने त्यांच्या नात्याचा स्वीकार देखील केला आहे. शिवाय हे प्रेमी युगूल लवकरच विवाह करणार असल्याच्या चर्चा देखील जोर धरत आहेत.