Georgia Andriani: अरबाज खानची गर्लफ्रेंड हिचा सर्वात बोल्ड लूक, वाढवला इंटरनेटचा पारा

Georgia Andriani Video: बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जॉर्जियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिचा हॉट अंदाज दिसून येत आहे.

Updated: Sep 28, 2022, 01:35 PM IST
Georgia Andriani: अरबाज खानची गर्लफ्रेंड हिचा सर्वात बोल्ड लूक, वाढवला इंटरनेटचा पारा  title=

Georgia Andriani Boldest Look: जेव्हापासून जॉर्जियाला (Georgia Andriani) अरबाज खान याची गर्लफ्रेंड म्हणून ओळख मिळाली आहे, तेव्हापासून ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. जॉर्जिया दररोज छोट्या प्रोजेक्टमध्ये दिसत आहे. पण अरबाजची गर्लफ्रेंड असण्याव्यतिरिक्त, ती ज्या गोष्टीसाठी चर्चेत असते ती म्हणजे तिचा बोल्ड अंदाज. अलीकडेच या अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती हिरव्या रंगाच्या ब्रॅलेट आणि स्कर्टमध्ये दिसत आहे. तिचा हा हॉट लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

जॉर्जियाचा हॉट लूक

नुकताच जॉर्जियाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट अंदाजात दिसत आहे. तिने हिरवा ब्रॅलेट घातला आहे आणि व्हिडिओ पाहून असे दिसते आहे की तिने ब्रॅलेटच्या खाली स्कर्ट कॅरी केला आहे. जॉर्जियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जॉर्जियाची ही स्टाईल तिच्या चाहत्यांसाठी खूपच आकर्षक आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतो, जॉर्जियाचा हा व्हिडिओ खूप जुना आहे, जो पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागला आहे.

जॉर्जिया सोशल मीडियावर सक्रिय  

जॉर्जियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लूकसाठी तिने न्यूड मेकअप लूक स्वीकारला आहे.  जॉर्जिया सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे बोल्ड आणि हॉट लूक एकापेक्षा जास्त वेळा चाहत्यांसोबत शेअर करत असते. या जोडीचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

कोण आहे जॉर्जिया 

जॉर्जिया एंड्रियानी एक इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे. जी सध्या बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी संघर्ष करत आहे. मात्र, अद्याप तिला अपेक्षित असलेली संधी मिळालेली नाही. बऱ्याच दिवसांपासून तिचे नाव अरबाज खान यांच्या सोबत जोडले जात आहे. तर जॉर्जिया अनेकदा सुट्टीच्या दिवशी अरबाजसोबत पार्टी करताना दिसत आहे. मलायका अरोरापासून घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज आणि जॉर्जिया एकमेकांना डेट करु लागले आहेत.