मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांची जोडी फारचं प्रसिद्ध आहे. मलायका-अर्जुनला मोस्ट रोमांटीक कपल म्हणून देखील ओळखलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करतात. अर्जुन कायम आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत मलायका अरोराला वेळ देत असतो. पण आता मलायकासोबत वेळ व्यतीत करण्यासाठी अर्जुनने एक सोपा मार्ग शोधून काढला आहे.
अर्जुन मलायकाच्या आणखी जवळ आला आहे. अर्जुनने मलायकाच्या शेजारी घर घेतलं आहे. अर्जुन कपूरने वांद्रे पश्चिममध्ये ज्याठिकाणी मलायका राहते त्याचं ठिकाणी घर घेतलं आहे. 25व्या मजल्यावर अर्जुनने एक स्कायव्हिला बुक केला असल्याचं सांगण्यात येत आहे. अर्जुन कपूरच्या या घराची किंमत 20 कोटी रूपये असल्याचं कळत आहे.
पण याबद्दल अर्जुनने कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिली नाही. सांगायचं झालं तर मलायका आणि अर्जुनच्या नात्याच्या चर्चा तुफान व्हायरल होत असतात. त्यांचं नातं प्रत्येकाला ठाऊक असल्यामुळे, मलायका-अर्जुन कधी लग्न करणार? या उत्तराची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे.
अर्जुन कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरचं अभिनेत्री रकुलरप्रीत सिंगसोबत 'सरदार ऑफग्रँडसन' चित्रपटात झळकणार आहे. त्याशिवाय अर्जुन 'भूत पुलिस' आणि वो 'एक विलेन रिटर्न' या चित्रपटांमध्ये देखील झळकणार आहे.