मुंबई : बिग बॉस या रियालिटी शो मधून प्रसिद्धीस आलेली अर्शी खान अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे आणि डान्समुळे चर्चेत असते. याशिवाय अर्शी कोणत्या ना कोणत्या पार्टीत किंवा स्टेज शो मध्येही दिसते. अलिकडेच राजीव खंडेलवालच्या टॉक शो मध्ये तिने हजेरी लावली. या टॉक शो मध्ये तिने मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. आपले वैयक्तिक आयुष्य आणि करिअर यावर ती मोकळेपणाने बोलली. यावेळेस तिने एका सत्य घटनेवरून पडदा दूर केला. त्यामुळे तिला बदनामीलाही सामोरे जावे लागले होते. २०१५ मध्ये क्रिकेटर शाहिद आफ्रीदीवर अर्शीने अनेक आरोप लावले होते.
या टॉक शो मध्ये राजीव खंडेलवालने याबद्दल छेडले असता अर्शी म्हणाली की, शाहिद आफ्रीदीसोबत माझे खूप चांगले संबंध आहेत. मी त्याचा आदर करते आणि तो खूप चांगला माणूस आहे. माझे ट्वीट करणे ही माझी चूक होती. अशा गोष्टींवर मोकळेपणाने बोलले नाही पाहिजे.
२०१५ मध्ये अर्शी खानने ट्वीट केले होते की, शाहिदी आफ्रीदीसोबत माझे संबंध आहेत आणि यासाठी मला मीडियाशी परवांगी घेण्याची गरज नाही. हा माझा खाजगी प्रश्न आहे. तिच्या या ट्वीटनंतर या दोघांचे संबंध चर्चेचा विषय ठरला होता. मात्र यावर शाहीद आफ्रीदीने मौन बाळगणे पसंत केले होते.
अलिकडेच अर्शी खान, सपना चौधरी आणि राखी सावंत एकत्र डान्स करताना दिसल्या. एका कार्यक्रमात तिघीही एकत्र थिरकल्या. यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.