म्हणून एक आठवड्यानंतर पाकिस्तानमध्ये 'बादशाहो' रिलीज

बॉलीवूड अभिनेता अजय देवगनच्या बादशाहो चित्रपटानं सहा दिवसांमध्ये ६० कोटींपेक्षा जास्तची कमाई केली आहे.

Updated: Sep 7, 2017, 09:25 PM IST
म्हणून एक आठवड्यानंतर पाकिस्तानमध्ये 'बादशाहो' रिलीज title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अजय देवगनच्या बादशाहो चित्रपटानं सहा दिवसांमध्ये ६० कोटींपेक्षा जास्तची कमाई केली आहे. भारतामध्ये बक्कळ कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट पाकिस्तानमध्ये शुक्रवारी रिलीज होणार आहे.

भारताप्रमाणेच हा चित्रपट पाकिस्तानमध्येही १ सप्टेंबरलाच रिलीज होणार होता, पण पाकिस्तानातल्या प्रदर्शक आणि वितरकांकडून ईदच्या वेळी भारतीय चित्रपट प्रदर्शित करू नये म्हणून दबाव होता. ईदच्या दिवशी पाकिस्तानमध्ये 'पंजाब नही जाऊंगी' आणि ‘ना मालूम अफराद 2’ हे दोन मोठे चित्रपट रिलीज झाले.

पाकिस्तानमध्ये 'पंजाब नहीं जाऊंगी' १२०० स्क्रीनवर आणि ‘ना मालूम अफराद 2’१५०० स्क्रीनवर रिलीज झाली होती. याचवेळी बादशाहो सारखी मोठं बजेट असलेला भारतीय चित्रपट रिलीज झाला असता तर पाकिस्तानी चित्रपटांच्या कमाईवर परिणाम झाला असता, म्हणून आता शुक्रवारी बादशाहो पाकिस्तानमध्ये रिलीज होणार आहे.