'पती, पत्नी और वो..', पत्नीने दोघांना रंगेहात पकडलं आणि...

पतीला दुसऱ्या मुलीसोबत पाहताचं भडकली पत्नी, व्हिडीओ व्हायरल   

Updated: Jul 24, 2022, 10:54 AM IST
'पती, पत्नी और वो..', पत्नीने दोघांना रंगेहात पकडलं आणि...  title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ प्रसिद्ध अभिनेत्याचा आहे. ओरिया अभिनेता बाबूशान मोहंतीचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मोहंतीची पत्नी आणि सहअभिनेत्री प्रकृती मिश्रा यांच्यात भांडण झाल्याचं दिसत आहे. त्यांची भाडणं एवढ्यात थांबली नाही, तर पोलीस स्थानकापर्यंत पोहोचली. 

कारमध्ये पत्नीने पतीला अभिनेत्रीसोबत पकडलं
व्हिडीओमध्ये बाबूशानची पत्नी तृप्तीने पती आणि प्रकृतीला कारमध्ये एकत्र पकडल्यानंतर तिला मारहाण करायला सुरुवात केली. जेव्हा प्रकृतीने  पळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तृप्ती प्रकृतीचे केस ओढले आणि तिला मारहाण केली. 

एवढंच नाही तर, तृप्ती प्रकृतीला रिक्षात बसण्यापासून थांबवत असल्याचं देखील व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. तर तृप्तीचं मानसिक संतुलन बिघडल्याचा आरोप देखील प्रकृतीने केला. सध्या दोघींचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या घटनेच्या काही तासांनंतर अभिनेत्री प्रकृतीची आई कृष्णप्रिया मिश्रा यांनी खारावेला नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. व्हायरल व्हिडिओवर डीसीपी म्हणाले की, घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी पोलीस गेले आहेत. आम्हाला मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे या प्रकरणात तपास केला जाईल.' 

सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. बाबूशान नुकताच ओडिया सिनेमा "प्रेमम" मध्ये प्रकृतीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला होता.