नवी दिल्ली : क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला विवाहबद्ध झाले. त्यापुर्वीपासूनच त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. आणि त्यांनी लग्नाची अधिकृत घोषणा केल्यानंतर तर सर्वत्र त्यांचीच चर्चा होती. अजूनही ती काही संपायचे नाव घेत नाही. अशातच एक खास माहिती हाती आली आहे.
विरूष्काच्या डेस्टिनेशन वेडिंग मोजकेच ४४ पाहुणे उपस्थित होते. त्यांना रितीप्रमाणे विरूष्काने रिटर्न गिफ्टही दिले. विराट आणि अनुष्का दोघंही धार्मिक असून ते दोघंही प्रसिद्ध कवी आणि संत रुमी यांचे मोठे चाहते आहेत. म्हणून त्यांनी त्यांच्या सर्व पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून रूमींच्या कवितांचे पुस्तक भेट दिले.
या डेस्टिनेशन वेडिंगनंतर २१ डिसेंबरला दिल्लीत तर २६ डिसेंबरला मुंबईत रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.