आई होण्याआधी अनुष्काने विराटसमोर ठेवली होती अट

अनुष्काची ही अट विराटने मान्य केली का? 

Updated: Jun 28, 2021, 11:27 AM IST
आई होण्याआधी अनुष्काने विराटसमोर ठेवली होती अट

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा कायम चर्चेत असते. अनुष्काने चित्रपटांमधून ब्रेक घेतला तरीही मात्र सोशल मीडियावर ती ऍक्टिव्ह असते. अनुष्काने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत केलं. दोघांची जोडी चाहत्यांनी प्रचंड पसंतीस पडत आहे. यंदाच्या वर्षी अनुष्का आणि विराटने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचं नाव वामिका असं आहे. दोघेही मिळून मुलीचा सांभाळ करतात. पण आई होण्याआधी अनुष्काने विराटसमोर एक अट ठेवली. 

अनुष्काने सांगितलं होतं की त्यांच्या मुलांचा सांभाळ एका सामान्य मुलांप्रमाणे व्हायला हवा. त्यांच्या कामाचा कोणताही परिणाम मुलांच्या जीवनावर होता कामा नये याकडे त्यांचं जास्त लक्ष असायलं हवं. विचार केलेल्या पद्धतीनेचं विराट आणि अनुष्का मुलगी वामिकाचा सांभाळ करत आहेत.  विराटने देखील त्यांच्या मुलांबद्दल एक महत्त्वाची गोष्ट शेअर केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विराट म्हणाला, 'गेल्या काही वर्षांमध्ये अनुष्कासोबत असल्याने माझ्या आयुष्यात अनेक बदल झाले. माझं स्वतःचं जीवन आहे.  माझं कुटुंब आहे. माझ्या मुलांसोबत वेळ व्यतीत करण्याचा मला पुर्ण हक्क आहे. मी माझ्या करियर आणि कामाच्या गोष्टी कधीच घरी शेअर करत नाही. माझे पुरस्कार देखील घरात नसतील कारण जेव्हा मुलं मोठी होतील तेव्हा त्यांना असं नको वाटायला की ते एका सेलिब्रिटींच्या घरतील आहेत.'

सांगायचं झालं तर विराट आणि अनुष्काने 2018मध्ये लग्न केलं. दोघांनी इटलीमध्ये  सप्तपदी घेतल्या. लग्ना आधी अनेक वर्ष दोघ एकमेकांना डेट करत होते.