close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'भारत'च्या कमाईने गाठला विक्रमी आकडा

सलग दोन अठवड्यांनंतरही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या कमाईचा आकडा चढत्या क्रमावर आहे.

Updated: Jun 27, 2019, 08:19 AM IST
'भारत'च्या कमाईने गाठला विक्रमी आकडा

मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान स्टारर 'भारत' चित्रपट ईदच्या मुहूर्तावर ५ जून रोजी प्रदर्शित झाला. सलग दोन अठवड्यांनंतरही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या कमाईचा आकडा चढत्या क्रमावर आहे. सलमानने चाहत्यांना चांगलीच ईदी दिली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल ३२५ कोटींचा उच्चांक गाठला आहे. सलमानच्या 'भारत' चित्रपटाचे जगभरातून कौतुक होत आहे. त्याचप्रमाणे समीक्षकांनीदेखील चित्रपटाला चांगली दाद दिली होती. 

हीच एकंदर कामगिरी पाहता 'भारत' चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करताना दिसत आहे. चित्रपट भारत देशातच नव्हे तर, ७० देशांमध्ये तब्बल १हजार ३०० स्क्रीनवर प्रकर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास यांनी केले आहे.

गेल्या आठवड्यात ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी 'भारत' चित्रपटाच्या कमाईचे आकडे ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले होते. सर्वत्र विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या चर्चा आहे. अशा परिस्थितही भारत'ची छाप पाहायला मिळत आहे.  

ब्लॉकबस्टर ठरलेला 'भारत' चित्रपट येत्या दिवसात किती कोट्यांपर्यंत मजल मारेल हे पाहाणं औत्सुक्याचे ठरणार आहे. चित्रपटात सलमान खान, कतरिना कैफ यांच्याव्यतिरिक्त चित्रपटात दिशा पटनी, सुनील ग्रोवर, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, असिफ शेख अशा तगड्या स्टारकास्टने चित्रपटामध्ये भूमिका साकारली आहे. 

ब्लॉकबस्टर ठरलेला 'भारत' चित्रपट येत्या दिवसात किती कोट्यांपर्यंत मजल मारेल हे पाहाणं औत्सुक्याचे ठरणार आहे. चित्रपटात सलमान खान, कतरिना कैफ यांच्याव्यतिरिक्त चित्रपटात दिशा पटानी, सुनिल ग्रोवर, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, असिफ शेख अशा तगड्या स्टारकास्टने चित्रपटामध्ये भूमिका साकारली आहे.