'भारत'मधील दिशाच्या 'स्लो मोशन' गाण्याने तरूण घायाळ

दिशा आणि सलमान 'स्लो मोशन' या गाण्यावर चांगलेच थिरकताना दिसत आहेत.

Updated: Apr 25, 2019, 03:17 PM IST
'भारत'मधील दिशाच्या 'स्लो मोशन' गाण्याने तरूण घायाळ title=

मुंबई : 'आजा डूब जाऊं तेरी आंखों के ऑशन में, स्लो मोशन में' 'भारत' चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित झाले आहे. दिशा आणि सलमान 'स्लो मोशन' या गाण्यावर चांगलेच थिरकताना दिसत आहे. गाणं प्रदर्शित होताच इंटरनेटवर चांगलेच गाजत आहे. हे गाणं विशाल-शेखर आणि नाकाश अजीज यांच्यासोबत श्रेया घोषाल यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे.

अभिनेता सलमान खानने खुद्द त्याच्या ट्विटर अकाउंटवरून हे गाणं पोस्ट केलं आहे. त्यानंतर अभिनेत्री दिशा पटानीने सुद्धा तिच्या सोशल अकाउंटवरून गाणं शेअर केलं आहे. सध्या सलमान-दिशाचं 'स्लो मोशन' तरूणांना आकर्षित करत आहे.

'भारत' चित्रपटा माध्यमातून पुन्हा एकदा सलमान आणि कतरिना ही रुपेरी पडद्यावरील चाहत्यांची सर्वाधिक आवडती जोडी आणि त्यांची केमिस्ट्री पुन्हा पाहायला मिळणार आहे. जॅकी 
श्रॉफ, सुनील ग्रोवर हे कलाकारही चित्रपटाच्या ट्रेलरमधून झळकत आहेत. 'ओड टू माय फादर' या कोरियन चित्रपटाचा रिमेक असणाऱ्या 'भारत' चित्रपटात देशाला स्वातंत्र मिळाल्यापासून ते २०१४ पर्यंतचा काळ रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.