'तारक मेहता...' फेम टप्पूची वडिलांसाठी भावूक पोस्ट; सोनू सूदचे मानले आभार

टप्पूच्या वडिलांचं काहीदिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झालं. 

Updated: May 14, 2021, 01:57 PM IST
'तारक मेहता...'  फेम टप्पूची वडिलांसाठी भावूक पोस्ट; सोनू सूदचे मानले आभार

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. मालिकेतील टप्पूसेना म्हणजे गोकूळ धाम सोसाटीमधील शान. त्याचं टप्पूच्या वडिलांचं काहीदिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झालं. आता वडिलांच्या आठवणीत टप्पूने एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्याने अभिनेता सोनू सूदचे आभार मानले आहेत. शिवाय वडिलांच्या उपचारासाठी मदत  केलेल्या नर्स, डॉक्टरांचे देखील टप्पूने आभार मानले आहेत.  टप्पू म्हणजेच भव्य गांधीने वडिलांसाठी शेअर केलेल्या पोस्टवर अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 

पोस्ट करत भव्य म्हणतो, 'माझ्या वडिलांना 9 एप्रिल रोजी कोरोना झाला. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना डॉंक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. कोरोनावर मात करण्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केले. माझ्या आयुष्यात जे काही चांगलं झालं आहे, त्याचं श्रेय फक्त आणि फक्त माझ्या वडिलांना जातं.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhavya Gandhi (@bhavyagandhi97)

भव्यने पुढे लिहिलं आहे की, 'मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो लसीकरण करून घ्या. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. प्राणघातक व्हायरसवर मात करण्यासाठी हाच एक पर्याय आहे.' या  कठीण काळात ज्यांनी भव्यची मदत केली, त्यांचे सर्वांचे भव्यने आभार मानले. 

सर्वांचे आभार मानत भव्य म्हणाला, 'मी सर्व डॉक्टर, नर्स आणि सर्व रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. ज्याठिकाणी माझे वडील दाखल होते. सोनू सुद सरांचे देखील आभार... मला माहित आहे पापा तुम्ही आहात त्याठिकणी आनंदी आहात. मला सगळं काही शिकवण्यासाठी आभार. लव्ह यू पापा...'