करीनाच्या सिक्रेट अफेयरबद्दल रणबीरकडून मोठा खुलासा

रणबीर कपूर अभिनेत्री आणि बहिण करीना कपूरच्या सिक्रेट अफेयरबद्दल सांगणार होता...

Updated: Sep 18, 2021, 09:37 AM IST
करीनाच्या सिक्रेट अफेयरबद्दल रणबीरकडून मोठा खुलासा

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून कपूर कुटुंब बॉलिवूडवर राज्य करत आहे. सध्या कपूर कुटुंबाची मुलगी करीना कपूर खान आणि मुलगा रणबीर कपूर यांचा बॉलिवूडमध्ये बोलबाला आहे. त्यामुळे दोघांच्या खासगी आयुष्याबद्दल आणि अफेयर्सबद्दल जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या चाहत्यांच्या मनात असते. जेव्हा 'शमशेरा' स्टारर अभिनेता रणबीर कपूर अभिनेत्री आणि बहिण करीना कपूरच्या सिक्रेट अफेयरबद्दल सांगणार होता तेव्हा करिनाने त्याला मर्यादीत राहण्यास सांगितले. 

दरम्यान, 'कॅफी विथ करण'च्या शोमध्ये कपूर भावंडांनी अनेक गोष्टींबद्दल खुसाला केला. शोमध्ये रणबीर म्हणाला, 'जेव्हा मी कलाविश्वात पदार्पण केलं तेव्हा, मी माझ्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. तेव्हा मला असं वाटलं आता बस... पण बॉलिवूडमध्ये येण्याआधीच अनेक गोष्टी वाऱ्यासाख्या पसरल्या होत्या.  '

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे रणबीर म्हणाला, 'माझ्या खासगी आयुष्याबद्दल अनेकांना ठावूक आहे. मला नाही माहिती करीनाने तिच्या सर्व रिलेशनशिपबद्दल सांगितलं असेल.' यावर करीना म्हणाही, 'सर्व नाही काही अफेर्सबद्दल...' त्यानंतर आगीत तेल ओतत करणने याबद्दल अनेक प्रश्न विचारू लागला. 

यावर करीना म्हणाली, 'मी शांत आहे. मी सर्व उत्तरे चांगली दिली आहेत. मी सगळ्यांची प्रेम प्रकरणं उघडावी अशी तुमची इच्छा आहे का? यानंतर रणबीर कपूरने माघार घेतली आणि कोणत्याही गप्पांबद्दल काहीही उघड करण्यास नकार दिला. करीनाने कोणत्याही गप्पांबद्दल काहीही सांगण्यास नकार दिला होता. करीनाचे कोणतेही रहस्य रणबीर सांगू शकला नाही.