Neha Sharma Career: हिरो-हिरोइन बनण्याची इच्छा मनात बाळगून अनेक जण बॉलिवूडमध्ये येतात. काहींचं स्वप्न लगेचच पूर्ण होतात तर काहींना यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. मात्र या संघर्षानंतरही बॉलिवूडमध्ये जम बसेलच याची खात्री नसते. काही अशा अभिनेत्रीदेखील आहेत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केलेत मात्र तरीही त्यांना प्रसिद्धी मिळाली नाही. त्यांनी संपूर्ण करिअरमध्ये एकही हिट फिल्म दिलेली नाही.
बिहारच्या भागलपुरमध्ये जन्मलेल्या नेहा शर्मा हीने देखील हिरोइन होण्यासाठी मुंबई गाठली. मात्र तिच्या पदरी अपयशच आहे. नेहा शर्मा हिचे वडिल राजकारणी आहेत. बिहारचे विधानसभा सदस्य अजीत शर्मा यांची ती मुलगी आहे. नेहा शर्माचे मुळचे गाव बिहार आहे. मात्र, मुंबईत येऊन तिने स्वतःच्या बळावर बॉलिवूडमध्ये नशीब आजमवण्यासाठी प्रयत्न केले. नेहाचे इन्स्टाग्रामवर मिलियन फॉलेवर्स आहेत. चित्रपटांपेक्षा तिच्या सौंदर्यामुळं ती लाइमलाइटमध्ये राहते.
चित्रपटांमध्ये नशीब आजमवण्यापूर्वी ती फॅशन डिझाइनर म्हणून काम पाहत होती. ती यंगस्टर्स असतानाच तिने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. गेल्या 20 वर्षांपासून ती बॉलिवूडमध्ये काम करतेय. आत्तापर्यंत तिने 11 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. मात्र, आत्तापर्यंत एकाही चित्रपटात तिला यश मिळालेला नाही. तिची एकही सोलो फिल्म हिट ठरलेली नाहीये.
बॉलिवूडमध्ये नेहा शर्माने पहिला चित्रपट केला तो म्हणजे क्रुक. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद तसा कमीच मिळाला मात्र या चित्रपटाची गाणी मात्र हिट ठरली. त्याव्यतिरिक्त तिने यमला पगला दिवाना, तान्हाजी, मुबारकासारख्या चित्रपटात काम केले. अभिनेत्रीने तामिळ, तेलगु, कन्नड आणि मल्याळम चित्रपटातदेखील काम केले आहे. चित्रपटांपेक्षा नेहा सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे एकापेक्षा एक छान फोटो शेअर करताना दिसते.
नेहा शर्मा हिचे वडिल अजीत शर्मा यांना पुन्हा एकदा भागलपूर मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की वडिलांच्या जागी नेहा शर्माला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे. मात्र, काँग्रेसने या चर्चांवर पूर्णविराम देत अजीत शर्मा यांनाच तिकिट दिले आहे. आज आजीत शर्मा यांनी त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.