मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर यांच्या लग्नाला ३० एप्रिलला २ वर्ष पूर्ण झाले. या खास प्रसंगी दोघेही अत्यंत आनंदी आणि एक्सायडेट होते. हा आनंद त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ, फोटोज शेअर करुन व्यक्त केला.
अलोन सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघांचीही ओळख झाली. त्यानंतर काही दिवस त्यांनी एकमेकांना डेट केले. त्यानंतर ३० एप्रिल २०१६ मध्ये दोघेही विवाहबद्ध झाले. बिपाशाने अनेक बॉलिवूड सिनेमात एकत्र काम केले. २००१ मध्ये आलेल्या अजनबी सिनेमात तिने नकारात्मक भूमिका साकारली होती आणि तिचा तो सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर २०१५ मध्ये आलेल्या अलोनमध्ये ती शेवटची झळकली. तिचे आयटम नंबर्सही अत्यंत प्रसिद्ध आहेत. हॉट, बोल्ड अभिनेत्री म्हणून बिपाशाकडे पाहिले जाते.