बर्थडे स्पेशल : करण जोहर सेक्सनंतर करतो हे काम...

बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा आज ४६ वा वाढदिवस आहे. 

Updated: May 25, 2018, 01:19 PM IST
बर्थडे स्पेशल : करण जोहर सेक्सनंतर करतो हे काम...

मुंबई : बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा आज ४६ वा वाढदिवस आहे. गेल्या दोन दशकांपासून बॉलिवूडमध्ये तो सक्रिय आहे. अनेक मुलाखतींमध्ये त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने चर्चा केली. सरोगसीद्वारे तो दोन जुळ्या मुलांचा पालक झाला आहे. करण जोहर समलैंगिक असण्यावर बॉलिवूडमध्ये मोठ्या चर्चा रंगल्या, त्याची थट्टा करण्यात आली. एका मुलाखतीत तो आपल्या सेक्सलाईफबद्दल मोकळेपणाने बोलला. त्याने सांगितले की, २६ वर्षांचा असताना त्याने पहिल्यांदा सेक्स केले होते. कुछ कुछ होता है प्रदर्शित झाल्यानंतर करण जोहर न्युयॉर्कला गेला होता. तिथेच त्याने पहिल्यांदा सेक्स केले. पुढे तो म्हणाला की, सेक्स केल्यानंतर त्याला शॉपिंग करणे खूप आवडते. सेक्स केल्यानंतर तो शॉपिंग करतो आणि नवीन कपडे खरेदी करतो.

करणने सांगितले की, त्याला सेक्सी चॅट करणे आणि फ्लर्ट करणे खूप आवडते. तो त्याच्या खास अंदाजात चॅटिंग करतो. तो जे शब्द वापरतो किंवा बाकी खास गोष्टी करतो, त्या त्याला भावतात. तसंच काही खास गोष्टी आहेत ज्या तो या प्रसंगी करतो.

# करण जोहरचे वजन लहानपणापासूनच खूप जास्त होते आणि यामुळे त्याला डिप्रेशनचाही सामना करावा लागला.

# करण जोहरचे पहिले प्रेम अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना होते.

# करणने शाहरुखच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सिनेमात असिस्टेंट डिरेक्टर म्हणून काम केले होते. 

# DDLJ मध्ये करण शाहरुख खानचा कॉस्टयूम डिजाईनर होता. 

# करण ममाज बॉय आहे. अनेकदा तो त्याच्या आईसोबत स्पॉट झाला आहे.

# करणला पहिल्यांदा वाटत होते की, 'क' शब्द त्याच्यासाठी फार लकी आहे. म्हणून त्यावरुन तो सिनेमाची नावे ठेवत असे. उदा. कुछ कुछ होता है’, कभी ख़ुशी कभी ग़म’, कभी अलविदा ना कहना. राजकुमार हिरानीचा ‘लगे रहो मुन्ना भाई’सिनेमा पाहिल्यानंतर त्याने 'क' शब्दाचा वापर करणे बंद केले.