मुंबई : टेलिव्हीजन क्वीन एकता कपूरचा आज ४३ वा वाढदिवस आहे. एकता एक यशस्वी मालिका आणि सिनेमांची निर्माती आहे. १९ वर्षांची असल्यापासून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याविषयीच्या काही खास गोष्टी...
# टेलिव्हीजनपासून सिनेसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांसाठी एकता कपूर गॉड मदर आहे. तिच्या मालिकांमधील कलाकारांनी बॉलिवूडमध्येही चांगले नाव कमावले. विद्या बालन, सुशांत सिंग राजपूत या कलाकारांना एकताने ब्रेक दिला होता.
# एकता अधिकतर काळ्या रंगाचे कपडे घालते. अनेक इव्हेंट्स, कार्यक्रमांना एकता काळे कपडे घालून जाते. हा तिचा आवडता रंग आहे, असे तुम्हाला वाटेल. पण तिचा एस्ट्रोलॉजी आणि न्युमरोलॉजीवर गाढ विश्वास आहे. कोणत्यातरी एस्ट्रोलॉजरने तिला काळ्या रंगाचे कपडे घालण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून ती अधिकतर काळ्या रंगाचे कपडे घालते. इतकंच नाही तर एक स्पेशल अंगठीही ती परिधान करते.
# एकताने आई शोभा कपूरसोबत मिळून बालाजी टेलीफिल्म्सची सुरुवात केली. दोघी मिळून याचा सगळा कारभार सांभाळतात. 'क्योंकि मैं झूठ नहीं बोलता' या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. यानंतर तिने अनेक सिनेमांची निर्मिती, दिग्दर्शन केले.
# एकता कपूरचे नाव अनेकदा करण जोहरसोबत जोडले गेले आहे. मात्र एकता कधीही यावर मोकळेपणाने बोलली नाही.