'मला तेव्हा काहीच वाटलं नाही...'; Animal मधील 'मॅरिटल रेप सीन'वर बॉबी देओलची पहिली प्रतिक्रिया

Bobby Deol on Animal Scene : बॉबी देओलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'ॲनिमल' या चित्रपटातील 'मॅरिटल रेप सीन'वर प्रतिक्रिया दिली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 11, 2023, 11:36 AM IST
'मला तेव्हा काहीच वाटलं नाही...'; Animal मधील 'मॅरिटल रेप सीन'वर बॉबी देओलची पहिली प्रतिक्रिया title=
(Photo Credit : Social Media)

Bobby Deol on Animal Scene : 'ॲनिमल' हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटातील बॉबी देओलच्या भयाकन भूमिकेनं प्रेक्षकांची मने जिंकली. इतकंच नाही तर प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. बॉबीनं या चित्रपटात अबरार ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटात बॉबीचा एकही डायलॉग नसला तरी देखील त्यांच्या अभिनयाचे सगळे चाहते झाले आहेत. दरम्यान, या चित्रपटात 'मॅरिटल रेप सीन' दाखवण्यात आला असून त्यावरून मोठा वाद पेटला आहे. या सीनची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु असून त्याला ट्रोल करण्यात येत आहे. अखेर यावर आता बॉबी देओलनं प्रतिक्रिया दिली आहे. 

'ॲनिमल' मध्ये बॉबी देओलच्या 'मॅरिटल रेप सीन' वर चांगलाच वाद होतोय. या सगळ्यात बॉबीनं बॉलिवूड बबलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत बॉबीनं म्हटलं की या सीनला शूट करत असताना त्याला कोणत्याही प्रकारचा संकोच वाटत नव्हता. बॉबी म्हणाला की जेव्हा पासून मी माझ्या भूमिकेविषयी ऐकलं, तेव्हा पासून मला माहित होतं की या भूमिकेसाठी एकही डायलॉग नसला तरी यात खूप काही करू शकतो. खरं सांगायचं झालं तर, एक शब्दही न बोलता मला एक एनर्जी मिळाली, ज्यामुळे माझ्यातील काही बाहेर पडलं. बॉबी म्हणाला, जेव्हा मी पर्फॉर्म करायचो तेव्हा मला कोणत्याही प्रकारचा संकोच वाटत नव्हता.'bo

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बॉबी त्याच्या ग्रे भूमिकेविषयी म्हणाला की मी फक्त एक भूमिका साकारत होतो जो क्रुर आहे. जो एक दुष्ट माणूस आहे आणि तो त्याच्या पत्नींना अशा प्रकारची वागणूक देतो, तो असाच आहे आणि अशी प्रकारे मी ही भूमिका अशी साकरली. तो खऱ्या आयुष्यात त्याच्या तिन्ही पत्नीसोबत रोमॅन्टिक आहे. 

हेही वाचा : Animal फेम अभिनेता आणि मुक्ति मोहन अडकले लग्न बंधनात!

'ॲनिमल' च्या कमाई विषयी बोलायचे झाले तर प्रदर्शनाच्या फक्त 10 दिवसात भारतात त्यानं 430 कोटींची कमाई केली. तर वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे झाले तर चित्रपटानं 660 कोटींची कमाई केली. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई करत आहे. तर लवकरच हा चित्रपट 700 कोटींचा आकडा पार करणार.