शिल्पा शेट्टी करतेय Raj Kundra ला घटस्फोट द्यायची तयारी? ज्योतिषांकडून मोठा खुलासा

हा काळ पुढे गेल्यानंतर शिल्पा आणि तिच्या पतीच्या नात्यात....

Updated: Oct 16, 2021, 12:03 PM IST
शिल्पा शेट्टी करतेय Raj Kundra ला घटस्फोट द्यायची तयारी? ज्योतिषांकडून मोठा खुलासा
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : मागील काही दिवसांपासून अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा अश्लील व्हिडीओ प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सध्या जामीनावर राज कुंद्रा याची सुटका झाली असली तरीही माध्यमांपासून मात्र त्यानं काहीसा दुरावा पत्करला आहे. 

पतीपुढे इतक्या साऱ्या अडचणी उभ्या राहिल्यानंतर शिल्पा शेट्टीनं मोठ्या खंबीरपणे मुलांना सांभाळत या परिस्थितीला तोंड दिलं. अनेकदा तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिनं भावना व्यक्त केल्या. या साऱ्यामध्ये तिनं राजला घटस्फोट देण्याची तयारी केल्याचंही म्हटलं गेलं. 

आता म्हणजे ज्योतिषांनीच शिल्पा आणि तिच्या पतीच्या नात्याचं भाकित केलं आहे. या नात्याचं भविष्य सांगत असताना कितीही उलथापालथ आणि चढ- उतार आले तरीही येत्या काळात हे सारंकाही शांत होणार असल्याचं ज्योतिषांनी सांगितलं आहे. हा काळ पुढे गेल्यानंतर शिल्पा आणि तिच्या पतीच्या नात्यात परस्पर सामंजस्याने अनेक मुद्दे स्पष्ट होऊन त्यांचं नातं अधिक दृढ होईल असंही ज्योतिषांनी सांगितलं आहे. 

शिल्पा आणि राजचं नातं तुटणार नाही, यावर आता ज्योतिषांकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. शिल्पाची या साऱ्यामध्ये महत्त्वाची भूमिका असेल, जिथं ती राजला काही ठिकाणी आधार देऊ शकते असं म्हटलं जात आहे. तेव्हा आता हे नातं नेमकं कोणत्या वळणावर येतं आणि पुढे नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.