हे वागणं बरं न्हवं... मलायकाचं वागणं पाहून अर्जुनकडून जोरदार धक्का

सध्या ते सुट्टीचा आनंद घेत असले तरीही ... 

Updated: Dec 6, 2021, 12:01 PM IST
हे वागणं बरं न्हवं... मलायकाचं वागणं पाहून अर्जुनकडून जोरदार धक्का
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची प्रेयसी अभिनेत्री, मॉडेल मलायका अरोरा सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. कामाचा प्रचंड ताण असतानाही मलायका आणि अर्जुन एकमेकांना वेळ देत आहेत हे पाहून चाहत्यांना प्रचंड हेवा वाटत आहे. 

मलायका आणि अर्जुन कायमच त्यांच्या विविध कृतींमुळे आणि विविध ठिकाणी एकमेकांना दिलेल्या साथीमुळे प्रकाशझोतात येतात. 

सध्या ते सुट्टीचा आनंद घेत असले तरीही तिथं असं काही झालं, की अर्जुननं आपल्या प्रेयसीला स्विमिंगपूलमध्येच धक्का दिला. 

खुद्द अर्जुननंच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जिथे ही जोडी स्विमिंगपूलमध्ये अंडरवॉटर बायसिकल राईड करताना दिसत आहेत. 

जुगनू या गाण्याच्या ट्रॅकवर त्यानं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 'जेव्हा गर्लफ्रेंड ट्रेनरपेक्षाही जास्त कठोर आव्हानं देत असते... पाहा मी सुट्टीतही व्यायाम करतोय', असं कॅप्शन त्यानं दिलं. 

अर्जुन आणि मलायकाचा हा व्हिडीओ चाहत्यांसाठी एक नवा विषय आणि नवा कपल गोल देणारं ठरलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

दरम्यान, बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराईचे वारे वाहत असतानाच मलायका आणि अर्जुन त्यांच्या नात्याला नव्या टप्प्यावर कधी नेतता याचीच उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. तेव्हा आता ही जोडी त्यांच्या लग्नाची घोषणा केव्हा करणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.