इटलीतील 'या' ठिकाणी 'दीप-वीर'च्या विवाह सोहळ्याची तयारी जोरात

सोशल मीडियापासून कलाविश्वापर्यंत सर्वत्र चर्चा त्यांच्याच लग्नाची चर्चा सुरु आहे.   

Updated: Nov 12, 2018, 11:54 AM IST
इटलीतील 'या' ठिकाणी 'दीप-वीर'च्या विवाह सोहळ्याची तयारी जोरात  title=

मुंबई : बॉलिवूड आणि संपूर्ण भारतीय कलाविश्वात सध्याच्या घडीला प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या राम-लीला म्हणजेच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची तयारी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. सोशल मीडियापासून ते चाहत्यांमध्ये रंगणाऱ्या चर्चांच्या वर्तुळांमध्येही त्यांच्याविषयीच जाणून घेण्याची सर्वांमध्ये उत्सुकता आहे.  

अशा या लोकप्रियतेच्याशिखरावर पोहोचलेल्या जोडीचा लग्नमंडप सजण्यास सुरुवात झाली आहे. काही फॅनपेजवर पोस्ट करण्यात आलेले फोटो पाहता याचा सहज अंदाज लावता येत आहे. 

इटलीतील लेक कोमो इथल्या विला डेल बाल्बिनेल्लो (Villa del Balbianello) येथे 'दीप-वीर'च्या लग्नाची तयारी जोरात सुरु असून आता तेथील वातावरणातही एक वेगळ्याच प्रकारचं चैतन्य पाहायला मिळत आहे. 

१४ आणि १५ नोव्हेंबर अशा दोन दिवसांमध्ये ही सेलिब्रिटी जोडी विवाहबंधनात अडकणार असून, सिंधी आणि दाक्षिणात्य पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडणार असून काही मोजक्याच पाहुणे मंडळींची या खास विवाह सोहळ्याला उपस्थिती असणार आहे. 

बी- टाऊनमधूनही फार कमी चेहरे दीपिका आणि रणवीरच्या लग्न सोहळ्यासाठी जाणार असल्याचं कळतंय. आता ते चेहरे नेमके कोणाचे हे लग्नाच्या दिवशी कळेलच. दरम्यान, नुकतेच या दोन्ही सेलिब्रिटींनी कुटुंबियांसह इटलीच्या दिशेने पावलं उचलल्याचं कळत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आली समीप घटिका असं म्हणायला हरकत नाही.