जेव्हा रितेशनं घेतलेला ब्रेकअपचा निर्णय...

अशी झाली होती, जेनेलियाची अवस्था.... 

Updated: Oct 27, 2020, 03:49 PM IST
जेव्हा रितेशनं घेतलेला ब्रेकअपचा निर्णय...
संग्रहित छायाचित्र

मुंबई : बॉलिवूड आणि मराठी कलाविश्वात आपली वेगळी अशी ओळख प्रस्थापित करणाऱ्या अभिनेता रितेश देशमुख Riteish Deshmukh  आणि त्याची पत्नी, अभिनेत्री जेनेलिया देशमुख या दोघांकडेही एक स्टार कपल म्हणून पाहिलं जातं. रितेश आणि जेनेलिया अनेक प्रेमी युगुलांसाठीचा आदर्शच जणू. अशा या सेलिब्रिटी जोडीनं नुकतीच 'द कपिल शर्मा शो', या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी या दोघांच्याही सहजीवनाचा प्रवास उलगडला. इतकंच नव्हे, तर रितेशनं यावेळी त्यांच्या ब्रेकअपचा किस्साही सांगितल्याचं म्हटलं जात आहे. 

एकमेकांना साथ देण्यासाठी आणि याच नात्यासाठी ओळखली जाणारी ही जोडी अशा कोणत्या टप्प्यातून गेली, यावर अनेकांचा विश्वासच बसत नाही. पण, हे खरं आहे. अर्थात ही एक थट्टा होती ही बाबसुद्धा लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं. 

कपिल शर्माशी साच संदर्भात बोलताना रितेशनं सांगितल्यानुसार एकमेकांना डेट करत असतानाच एक दिवस त्यानं जेनेलियाला फोन केला. या नात्यातून आपल्याला माघार घ्यायची असल्याचं त्यानं तिला सांगतलंही. पण, ही मस्करी आहे हे जेनेलियाच्या लक्षातच आलं नाही. तिनं हे सारं गांभीर्यानं घेतलं. तिची यावरील प्रतिक्रिया आणि अवस्था पाहून पुन्हा कधीही तिच्यासोबत अशी मस्करी न करण्याचंच रितेशनं ठरवलं. 

 

अतिशय सुरेख अशा त्यांच्या या नात्याचा सर्वांना हेवाच वाटतो. रितेश आणि जेनेलिया एकमेकांना प्रेमानं कोणत्या नावांनी हाक मारतात, याचासुद्धा उलगडा या कार्यक्रमात झाला. रितेश त्याच्या पत्नीला प्रेमानं जेनी म्हणतो, तर जेनेलिया रितेशला ढोलू म्हणून हाक मारते. आहे की नाही ही केमिस्ट्री हटके?