Salman Khan Bigg Boss Fees: 'बिग बॉस' (Bigg Boss ) म्हटले की, सलमान खान (Salman Khan) याचे नाव घेणे अनिवार्य आहे. कारण आतापर्यंत तो हा कार्यक्रम होस्ट करत आहे. या शोच्या म्हणजेच सलमान खान याच्या आयुष्याबाबत अनेक अपडेट्स समोर येत आहेत. अलीकडेच, सलमान या सीझनसाठी 1000 कोटी घेणार असल्याची बातमी समोर आली होती. परंतु नुकत्याच आलेल्या एका मीडिया रिपोर्टमध्ये त्याची फी आणखी कमी केल्याचा दावा केला जात आहे. 1 ऑक्टोबरपासून सुरु होणार्या या शोच्या स्पर्धकांच्या यादीबद्दल सतत अटकळ बांधली जात आहे. परंतु अंतिम यादी अद्याप येणे बाकी आहे. पण या सगळ्यात सलमानच्या फीबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत.
'मिड डे' मधील एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की 'बिग बॉस' यापुढे OTT वर येणार नाही. कोरोनाच्या काळात ओटीटीवर आलेल्या 'बिग बॉस'ने गेल्यावेळी काही खास कामगिरी केली नाही आणि त्यामुळे शोला फारसा फायदा होऊ शकला नाही. इतके नुकसान झाल्यानंतर आता प्रायोजकांनी हात आखडते घेतले आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, यामुळे सलमान खान याने आपली फी कमी करण्याचा विचार केला आहे.
सलमानची फी कमी केली जाऊ शकते
सलमान खानच्या फीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्यावर्षी सलमान खानने 'बिग बॉस 15' साठी 350 कोटी रुपये घेतले होते आणि जर शोच्या निर्मात्यांनी हाच दृष्टिकोन ठेवला तर यावेळी सलमान खान मागील वेळेपेक्षा कमी फी घेत आहे. किंवा स्वत: सलमान खान याने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.
हे स्पर्धक असू शकतात
'बिग बॉस 16' च्या स्पर्धकांबद्दल बोलायचे झाले तर, यावेळी 'लॉकअप' रिअॅलिटी शोचा विजेता मुनव्वर फारुकी, फैजल शेख, 'भाभी जी घर पर हैं' फेम शुभांगी अत्रे, 'इमली' फेम फहमान खान, बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ, कनिका मान यासारख्या सेलिब्रिटींना 'बिग बॉस 16' साठी अप्रोच करण्यात आले आहे. तथापि, शोच्या निर्मात्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.