Salman Khan : जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाला....

Salman Khan: बॉलिवूडचा दबंग खान, अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याच्यासाठीच्या सुरक्षेाबाबत आणखी काळजी घेतली जात आहे. सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा कडक पहारा आहे.   

Updated: Mar 21, 2023, 11:22 AM IST
Salman Khan : जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाला....  title=
Bollywood Actor Salman Khan on receiving death threats latest Marathi news

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान, (Bollywood Actor Salman Khan) सलमान खान सध्या बऱ्याच अडचणींचा सामना करत आहे. सलमान आणि त्याच्या नावाभोवती असणारं वादाचं वलय सर्वज्ञात आहे. आता पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आल्यामुळं त्याचं नाव चर्चेत आलं आहे. भाईजानच्या टीमला त्याला जीवे मारण्याची धमकी देणारा एक Email आला आणि तातडीनं त्याची सुरक्षा वाढवण्यात आली. मुंबईतील वांद्रे भागात असणाऱ्या सलमानच्या घराला आणि त्याभोवतीच्या परिसरातही संरक्षणाचे चोख बंदोबस्त करण्यात आले आहेत. हे सर्वकाही सुरु असतानाच सलमानची पहिली प्रतिक्रियाही समोर आली आहे. (Bollywood Actor Salman Khan on receiving death threats latest Marathi news )

कुटुंबीय आणि मित्रपरिवार चिंतेत? 

सलमानला आलेल्या धमकीमुळं सध्या त्याचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार चिंतेत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण, खुद्द भाईजान मात्र या सर्व गोष्टींना अगदी शांतपणे सामोरा जाताना दिसत आहे. असं असलं तरीही कुटुंबाला चिंतेत पाहून त्यानं त्यांच्या काळजीपोटी आपले बरेच Outdoor shoots रद्द केल्याची माहिती अभिनेत्याच्या निकटवर्तीयांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. 

पाहा : Shivali Parab Bold Photos : 'छोटा पॅकेट बडा धमाका' शिवालीच्या Hot फोटोशूटने इंटरनेटवर 'नुसता जाळ अन् धूर'

 

संकटाच्या या प्रसंगी (Salman Khan Family) सलमानचं संपूर्ण कुटुंब एकत्र असून, त्याचे वडील सलीम खानही बरेच चिंतेत असल्याची माहिती समोर आली आहे. लेकाला मिळालेली धमकी पाहता त्यांची शांतताच भंग झाली आहे. पण, या साऱ्यामध्ये सलमान बराच सकारात्मक आहे. निकटवर्तीयांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार त्यानं या धमक्यांना आणि या संपूर्ण प्रकरणाला फारसं महत्त्वं न देण्याचं ठरवलं असून, 'धमकीला महत्त्वं देताना पाहून तुम्ही काही धमकी देणाऱ्याचंही महत्त्वं वाढवताय' अशीच प्रतिक्रिया त्यानं दिली. जे जेव्हा व्हायचं, तेव्हाच होईल... असं म्हणत सलमाननं या संपूर्ण तणावाच्या वातावरणात स्वत:चं मन शांत ठेवलं आहे. 

काय आहे धमकी प्रकरण? 

सलमानला यापूर्वी दोन ते तीन वेळा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 2019 मध्ये लॉरेन्स बिष्णोईनं धमकावलं होतं. इतकंच नव्हे, तर त्याला जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र त्याचे वडील सलीम खान यांना मिळालं होतं. काही महिन्यांपूर्वी आलेल्या धमकवणाऱ्या पत्रात सिद्धू मुसेवालासारखीच तुमची अवस्था करू असे शब्द वापरण्यात आले होते. काळवीट शिकार प्रकरणी सलमाननं माफी मागावी अन्यथा परिणामांना सामोरं जाण्यासाठी तयार रहावं असं या धमकीत म्हटलं गेलं होतं.