SSR Case : सुशांतच्या शेजाऱ्यांचा दावा; असं यापूर्वी कधीच झालं नव्हतं....

सीबीआय तपासानं चांगलाच वेग पकडल्याचं पाहायला मिळालं.

Updated: Aug 23, 2020, 11:15 AM IST
SSR Case : सुशांतच्या शेजाऱ्यांचा दावा; असं यापूर्वी कधीच झालं नव्हतं....  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेताsushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या हाती जाताच लगेचच हाचलाचींना वेग आला. पाहता पाहता प्रश्नोत्तरांच्या आणि चौकशीच्या या सत्रात काही मोठे खुलासे होऊ लागले. शुक्रवार, शनिवार या दोन्ही दिवसांमध्ये सीबीआय तपासानं चांगलाच वेग पकडल्याचं पाहायला मिळालं. यातच आता सुशांतच्या इमारतीतील एका रहिवाशांनी अतिशय महत्त्वाचा उलगडा केला आहे. 

आत्महत्येच्या एक दिवस आधी सुशांतच्या घरी कोणत्याही प्रकारची पार्टी झाली नव्हती, असा खुलासा शेजाऱ्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे. किंबहुना १३ जूनच्या रात्री सुशांतच्या घराची लाईट नेहमीपेक्षा जास्त लवकरच बंद झाली होती. असं यापूर्वी कधी झालं नव्हतं, त्याच्या घरातील लाईट इतकी लवकर बंद झाली नव्हती, असं या माहितीतून समोर आलं.

शेजाऱ्यांनी दिलेली ही माहिती पाहता आता तपासाला नेमकं कोणतं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, शुक्रवारी साऱ्या देशाचं आणि कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या आत्महत्या प्रकरणीच्या या तपासाअंतर्गत कूपर रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी करण्यात आली. ज्यामध्ये मुंबई पोलिसांच्या सांगण्यावरुनच कोविड चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच सुशांतच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती दिली. 

इतकंच नव्हे, तर सुशांतच्या आत्महत्येच्या कृत्याचं त्याच्या घरी रिक्रिएशनही करण्यात आलं. फॉरेन्सिक टीमनं सुशांतच्या खोलीसोबतच त्याच्या संपूर्ण घराचीही काही छायाचित्र घेत व्हिडिओग्राफी केल्याचं पाहायला मिळालं. 

 

सुशांतची हत्या करण्यात आली आहे, या त्याच्या कुटुंबाच्या दाव्यानुसार सीबीआयकडून त्याच्या घात पुरावे मिळवण्यासाठी म्हणून डमी टेस्ट करण्यात आली. नीरज आणि सिद्धार्थ पिठानीच्या उपस्थितीत मृतदेह ताब्यात येण्यापूर्वी नेमकं काय - काय घडलं होतं, त्या ठिकाणी कोण- कोण उपस्थित होतं याचंही रिक्रिएशन करण्यात आलं. सीबीआयकडून विविध दृष्टीकोनातून सुरु असणारा सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणीच्या या तपासातून दर दिवशी साक्षीदारांकडून काही नवे खुलासे करण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर आता या प्रकरणाच्या निकालरुपी हाती नेमकं काय येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.